No need for permission to plant or cut down trees anymore, Sandalwood tree news 
नागपूर

चंदनाचा सुगंध दरवळणार चोहिकडे; आता झाड लावणे, तोडण्यास परवानगीची गरज नाही

राजेश रामपूरकर

नागपूर : जागतिक बाजारात चंदनाची मागणी सातत्याने वाढत आहे. काही वर्षांमध्ये महाराष्ट्रातही चंदनाने मूळ धरले आहे. विशेषत: महाराष्ट्र वृक्षतोड (नियमन) अधिनियम १९६४ अन्वये चंदनाचे झाड तोडण्यास बंदी होती. राज्य सरकारने ही बंदी आता मागे घेतली आहे. त्यामुळे आता चंदनाची लागवड मोठ्या प्रमाणात होण्यास प्रोत्साहन मिळणार आहे. तसेच झाड तोडण्यासाठी वन विभागाची परवानगी लागणार नाही. शेतकऱ्यांच्या शेतात असलेल्या झाडाला वन विभागाच्या संरक्षणामधील झाड म्हणून वगळले आहे.

चंदनाचा सुगंध मनाला मोहित करणारा आहे. प्रत्येक देवघरात चंदनाचा ठेवा असतोच. पूजेसाठी चंदनाचा उपयोग केला जातो. या वृक्षाच्या लाकडापासून तयार केलेल्या काष्ठशिल्पांना मोठी मागणी आहे. मुबलक औषधी गुणधर्म असलेल्या चंदनाचा आयुर्वेद उपचारात उपयोग केला जातो. वास्तविक पाहता चंदनाची शेती केल्यास शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठी वाढ होऊ शकते पण कायद्याच्या कचाट्यात सापडण्याच्या भीतीने चंदनशेतीकडे लक्ष दिले गेले नाही. तसेच कायद्याच्या अडचणीही जाचक बनल्या होत्या.

आता सरकारने जाचक अटी काढून टाकल्याने मागणी आणि पुरवठा यातील तफावत दूर होण्याची शक्यता आहे. जागतिक बाजारातही चंदनाला मोठी मागणी आहे. देशात कर्नाटक, तामिळनाडू या राज्यांत चंदनाचे सर्वाधिक उत्पादन होते. आता उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, केरळ, आंध्र प्रदेश या राज्यांतील चंदनाचे क्षेत्र वाढीस लागले आहे.

काही वर्षांमध्ये महाराष्ट्रातही चंदनाने मूळ धरले आहे. १ टन चंदन लाकडापासून कमीत कमी ८ लाख रुपये उत्पन्न मिळू शकते. चंदनाचे प्रामुख्याने रक्तचंदन, लालचंदन आणि श्वेतचंदन असे प्रकार आहेत. लघू, मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी चंदनाचे झाड तोडण्यावर असलेली बंदी उठविण्याची विनंती करणारे पत्र केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले होते. बंदी उठविण्याचा निर्णय स्वागतार्ह असल्याचे सेवानिवृत्त प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) डॉ. रामबाबू यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्रात केवळ तीन हजार झाडे

राज्यात सध्या केवळ फक्त तीन हजार चंदनाची झाडे शिल्लक राहिलेली आहेत. त्यातील ६१४ हेक्टर जंगल हे अमरावती आणि यवतमाळ वनवृत्तात आहे. त्यामुळेच या वृक्षाचा समावेश इंडियन युनियन फॉर कंझरव्हेशन ऑफ नेचरमध्ये (आययुसीएन) करण्यात आलेला आहे.

चंदन झाडांची नावे

  • चंदल
  • सुखड
  • सुकेत
  • श्रीगधा
  • गंधा
  • अगरूगंधा
  • आनंदितम्
  • मल्यज
  • गंधसार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Latest Maharashtra News Updates : हिंदू हिंदुस्थान मान्य पण हिंदीची सक्ती मान्य नाही - उद्धव ठाकरे

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

Video Viral: कसोटी सामन्यात मैदानात आलेल्या कुत्र्याला ड्रोनने घाबरवलं; AUS vs WI लाईव्ह सामना थांबला

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

SCROLL FOR NEXT