Now teachers will also in trouble in Adarsh Award matter  
नागपूर

गट शिक्षणाधिकाऱ्यांसह शिक्षकही येणार अडचणीत.. आदर्श पुरस्कार प्रकरण

निलेश डोये

नागपूर : आदर्श पुरस्कारासाठी विभागीय चौकशी सुरू असलेल्या शिक्षकाच्या निवडप्रकरणी गट शिक्षणाधिकारी यांच्यासह प्रस्ताव सादर करणारा शिक्षकही अडचणीत येणार आहेत.  

शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीचे औचित्य साधून दरवर्षीय जिल्हा परिषदेच्या वतीने जि.प. शाळांमधील शिक्षकांना 'आदर्श शिक्षक' पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. प्राथमिक गटातून १३ व माध्यमिक गटातून २ अशा १५ शिक्षकांना आदर्श शिक्षक या पुरस्काराने गौरविण्यात येते. यंदाही या पुरस्कारासाठी जि.प.च्या शिक्षण विभागाकडे एकूण ३९ प्रस्ताव आले होते.

यापैकी ३६ प्राथमिक साठी तर ३ माध्यमिक गटासाठी आले होते. आदर्श पुरस्कारसाठी शिक्षकाची निवड करताना काही निकष आहेत. यात गैरव्यवहाराचे आरोपासोबत विभागीय चौकशी सुरू नसणे महत्त्वाचे आहे.

परंतु या निकषाला डावलून विभागीय चौकशी सुरू असलेल्या एका शिक्षकाची आदर्श पुरस्करासाठी जिल्हा परिषदने निवड केली. काही पात्र शिक्षकांना डावलल्याचीही ओरड होत असल्याने निवड प्रक्रियेवर प्रश्न चिन्ह उपस्थित करण्यात आले. शिक्षण सभापती पाटील यांनी कोणत्याप्रकारची नियमबाह्य निवड झाली नसल्याचा दावा केला होता.

परंतु त्यांचा दावा फोल ठरला आहे. त्यामुळे आता संबंधित शिक्षकाला जाहीर करण्यात आलेला पुरस्कार थांबविण्याची नामुष्की जिल्हा परिषदेवर ओढवली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार विभागीच चौकशी असताना प्रस्ताव समितीसमोर पवठविणे चुकीचे आहे. गटशिक्षण अधिकाऱ्यांनी कर्तव्यात कसूर केला. गट विकास अधिकाऱ्यांचाही यात दोष आहे.

विशेष म्हणजे संबंधित शिक्षकाला चौकशी सुरू असल्याची माहिती असताना प्रस्ताव सादर करायला नको होता. त्यामुळे गटशिक्षणाधिकाऱ्यासह शिक्षकही दोषी आहे. त्यामुळे या प्रकरणी सर्वच अडचणीत येणार असल्याचे सांगण्याच येते.

राज्य मंत्र्यांकडे तक्रार

आदर्श शिक्षक पुरस्कार निवडीत भेदभाव झाल्याची तक्रार प्रहार संघटनेचे जिल्हा प्रमुख रमेश कारामोरे यांनी शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याकडे केली असून त्यांनी चौकशीचे आदेश दिले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Alert : महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा, 48 तास कोसळणार धो-धो पाऊस; दिवाळीपर्यंत पाऊस राहणार?

Latest Maharashtra News Updates : कुख्यात गुंड छोटा राजनचा जामीन सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द

Navratri festival: '६०० वर्षांपूर्वीचे दुर्मिळ अलंकार रुक्मिणी मातेला परिधान करणार'; पंढरपूर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात नवरात्रोत्सवाची तयारी

Pune Grand Challenge : सायकल स्पर्धा; दर्जेदार रस्त्यांचे आव्हान, नोव्हेंबरपर्यंत कामे करावी लागणार पूर्ण; अटीशर्तींवरून आरोप

केरळमध्ये मेंदू खाणाऱ्या अमीबाचं थैमान, आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू; कसा होतो संसर्ग?

SCROLL FOR NEXT