नागपूर

ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर ठरतेय संजीवनी; आदिवासी, दुर्गम भागासाठी एनएसएसच्या विद्यार्थ्यांचा पुढाकार

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : नागपूरसारख्या मेट्रो शहरात (Nagpur Metro City) कोरोना रुग्णांना ऑक्सिजन मिळत नसताना विदर्भातील दुर्गम व आदिवासीबहुल गावांमध्ये (Tribal Villages) रुग्णांकडे लक्ष द्यायला कोणाला वेळ नाही. त्यामुळे शासकीय न्याय सहायक विज्ञान संस्थेच्या राष्ट्रीय सेवा योजना (National Service sceme) विभागाने रुग्णांसाठी ऑनलाइन निधी संकलित केला. त्यातून तीन ‘ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर मशीन (Oxygen Concentrator)’ खरेदी करून त्या आदिवासी भागात दान केल्या आहेत. या मशीन आता आदिवासींसाठी प्राणवायूचे काम करीत आहेत. (NSS students manages Oxygen concentrators for tribal villages)

कोरोनाच्या दुसऱ्या लाटने ग्रामीण भागातही विळखा घट्ट केला आहे. आधीच आरोग्य यंत्रणा तोकडी असल्याने अनेकांना आपले प्राण गमवावे लागत आहे. त्यातच दुर्गम, आदिवासी भागातील परिस्थिती आणखीच वाईट आहे. एनएसएसने ऑनलाइन मदतीसाठी आवाहन केले आणि दीड लाख रुपये गोळा झाले. त्यातून ५१ हजारांचे एक असे तीन ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर मशीन खरेदी करून चंद्रपूरच्या बामणी गावात देण्यात आले.

याशिवाय दोन ऑक्सिजन फ्लो मीटर दिले. तसेच गडचिरोली आणि भंडारा जिल्ह्याला दोन ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर पुरवण्यात आले आहेत. ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर हे ग्रामीण भागासाठी संजीवनी ठरत आहे. या संपूर्ण उपक्रमाला हाताळणारे एनएसएसचे प्रमुख डॉ. मालोजीराव भोसले यांनी आता दर पाच मिनिटाला ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटरसाठी मागणी येत असल्याचे सांगितले. त्यामुळे आणखी काही यंत्रे विकत घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. डॉ. भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्वजा गावंडे, गौरव निकम, संकेत जाधव काम करीत आहेत.

राज्यभरातून स्वागत

राज्यात ४००० तसेच देशामध्ये ३८ हजार राष्ट्रीय सेवा योजनेचे विभाग आहेत. न्याय सहायक विज्ञान संस्थेचे कार्यक्रम अधिकारी आणि विद्यार्थ्यांच्या प्रयोगाचे राज्यभरातून कौतुक होत आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी आणि प्र-कुलगुरू डॉ. संजय दुधे यांनीही प्रशंसा केली आहे.

राष्ट्रीय सेवा योजनेचे केवळ सदस्य न होता अशा कठीण काळात खऱ्या अर्थाने समाजाची सेवा करण्याचे काम हे स्वयंसेवक करीत आहेत.
-डॉ. संजय ठाकरे, संचालक, शासकीय न्याय साहायक विज्ञान संस्था

(NSS students manages Oxygen concentrators for tribal villages)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का! 40 वर्ष ठाकरेंसाठी काम करणाऱ्या नेत्याचा शिंदेसेनेत प्रवेश

PCB T20 WC 24 : वर्ल्डकप सुरू होण्याआधीच हरायची तयारी! गॅरी कर्स्टन बळीचा बकरा... पाकिस्तानचा माजी खेळाडू हे काय म्हणाला?

Crime: माजी मंत्र्याच्या क्रूर मारहाणीत पत्नीचा मृत्यू; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, लोकांमध्ये संताप

कोल्हापूर लोकसभेची निवडणूक ऐतिहासिक आणि कागल तालुक्याला आव्हान देणारी आहे; असं का म्हणाले मुश्रीफ?

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

SCROLL FOR NEXT