nsscdcl new LAD screen in city for advertisement 
नागपूर

महामट्रोच्या पावलावर 'स्मार्ट सिटी'चे पाऊल, उत्पन्न वाढीसाठी शोधा नवीन मार्ग

राजेश प्रायकर

नागपूर : महामेट्रोने उत्पन्न तसेच प्रवासी संख्या वाढविण्यासाठी विविध उपक्रम सुरू केले. महामेट्रोच्या पावलावर पाऊल टाकत आता नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलोपमेन्ट कॉर्पोरेशन लिमिटेडने (एनएसएससीडीसीएल) उत्पन्न वाढीसाठी मार्ग शोधला. शहरात चौकांमध्ये लावण्यात आलेल्या एलईडी स्क्रीनवर वाढदिवस, लग्नाचा वाढदिवसासह व्यावसायिक जाहिरातीसाठी नागरिक, व्यापाऱ्यांना संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

कंपनीने शहरातील प्रमुख ५१ चौकांमध्ये एलएडी लावले आहेत. यावर सध्या महापालिकेच्या विविध उपक्रमाची जनजागृती करण्यात येत आहे. आता या एलईडीवर व्यावसायिक तसेच वाढदिवस, लग्नाचा वाढदिवसाच्या जाहिराती प्रकाशित करून कंपनीला उत्पन्न मिळवून देण्याचा निर्णय मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांनी घेतला.  शहरातील नागरिकांना आता मित्र, नातेवाईकांच्या वाढदिवस, लग्नाचा वाढदिवसासाठी या एलएडी स्क्रीनवर जाहिरात देणे शक्य होणार आहे.

खालील चौकात लागले एलएडी -
शहरातील सावरकरनगर, शंकरनगर, ला कॉलेज चौक, लेडीज क्लब चौक, ५ मोहंमद रफी चौक, माटे चौक, आकाशवाणी चौक, जीपीओ चौक, भोले पेट्रोल पंप, संविधान चौक, व्हेरायटी चौक, कोका कोला चौक, मॉरिस कॉलेज चौक, झाशी राणी चौक, हिंगणा टी पॉईंट, जुना अमरावती नाका, नवीन काटोल नाका चौक, रवीनगर चौक, पागलखाना चौक, जरीपटका चौक, जरीपटका चौक, इंदोरा चौक, कडबी चौक, कमाल चौक, ऑटोमोटिव्ह चौक, कळमना मार्केट चौक, भारतवाडा चौक, महावीर चौक, हसनबाग चौक, सोना रेस्टॉरंट चौक, मेडिकल चौक, छोटा ताजबाग चौक, अग्रसेन चौक, मानस चौक, म्हाळगीनगर चौक, जयस्तंभ चौक, दही बाजार चौक, प्रतापनगर चौक, जुना काटोल नाका चौक, अशोक चौक, माऊंट कार्मेल शाळा चौक, रामनगर चौक, हॉटेल प्राईडपुढे, वर्धा रोड, मानकापूर क्रीडा संकुल, फुटाळा तलाव चौक, गोरेवाडा चौक, केटीनगर काटोल रोड, दिघोरी चौक, क्रीडा चौक, गोंडवाना चौक, एलएडी चौकात कंपनीने एलईडी स्क्रीन लावले आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अहिल्यानगर हादरलं! 'वैद्यकीय पदवी नसताना चालवला दवाखाना'; तीन बोगस डॉक्टरांवर गुन्हा, अनेक रुग्णांवर शस्त्रक्रिया

Pune News: शीव, पाणंद, रस्त्यांची गावदप्तरी नोंद होणार; जमाबंदी आयुक्त सुहास दिवसे समितीची राज्य सरकारला शिफारस

'मी जेवणात उंदीर खाल्लाय' 'लग्नानंतर होईलच प्रेम' मालिकेतील अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग, म्हणाली, 'हे ऐकून माझ्या....'

Ahilyanagar Crime:'सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने जीवन संपवले'; अकोले तालुक्यात उडली खळबळ

Latest Marathi News Live Updates : रायगडमध्ये तूफान पाऊस, रेड अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT