number of corona patients are near to 1 lac in Nagpur Corona Update  
नागपूर

नागरिकांनो सावध राहा! कोरोनाबाधितांचा आकडा पोहोचला लाखाजवळ; आज नवे ४२३ रुग्ण तर ११ मृत्यू 

केवल जीवनतारे

नागपूर ः जिल्ह्याच्या ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा एक लाखाजवळ पोहचला आहे.

जिल्ह्यात आढळून नव्याने बाधित झालेल्या ४२३ रुग्णांपैकी ३८४ कोरोनाबाधित शहरातील आहेत. यामुळे शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा ९९ हजार ६८० झाला आहे. तर ग्रामीण भागातील अवघे ३७ रुग्ण आढळले असून ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या २५ हजार २७७ झाली. यामुळे एकूण बाधितांचा आकडा १ लाख २५ हजार ७५५ झाला आहे. तर ११ कोरोनाबाधितांनी मागील २४ तासांमध्ये जीव गमावला आहे. यामुळे आतापर्यंतच्या कोरोना मृत्यूंची संख्या ३ हजार ९७६ झाली आहे.

जिल्ह्यात मंगळवारी (ता.५) ४ हजार ६९३ कोरोना चाचण्या झाल्या आहेत. यापैकी ४२३ जणांना बाधा झाल्याचा अहवाल प्रयोगशाळेतून पुढे आला आहे. आतापर्यंत ९ लाख ५५ हजार १० चाचण्या जिल्ह्यात झाल्या आहेत. यापैकी ५ लाख ८९ हजार १०७ चाचण्या या आरटीपीसीआर आहेत. तर उर्वरित ३ लाख ६५ हजार ९०३ चाचण्या रॅपिड ॲन्टिजेन झाल्या आहेत. 

दिवसभरात शहरातील २३४ आणि ग्रामीण भागातील ६० असे एकूण २९४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे आजपर्यंतच्या कोरोनामुक्तांची संख्या ९३ हजार ९६२ झाली आहे. तर ग्रामीण भागातील बरे झालेल्या रुग्णांची संख्या २३ हजार ६८३ झाली आहे. अशी एकूण १ लाख १७ हजार ६४५ व्यक्तींनी कोरोनावर मात केली आहे.

शहरी भागात ७५ टक्के सक्रिय रुग्ण

जिल्ह्याच्या तुलनेत शहरी भागात जास्त सक्रिय कोरोनाबाधित आहेत. एकूण ४ हजार १३४ सक्रीय कोरोनाबाधितांपैकी ७५ टक्के अर्थात ३ हजार ६० रुग्ण शहरातील आहेत. १ हजार ७४ रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. २ हजार ७८४ कोरोनाबाधित घरी राहूनच उपचार घेत आहेत. ९२७ रुग्णांवर मेडिकल, मेयोसह इतर रुग्णालयांत उपचार सुरू आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Power of Simple Living and Discipline : साधं राहणीमान अन् बचतीच्या जोरावर ४५व्या वर्षी निवृत्तीपर्यंत जमवले ४.७ कोटी; जाणून घ्या कसे?

Latest Marathi News Updates : दक्षिण मुंबईतील गणेशोत्सव मंडळांची बैठक सुरु, अडचणींवर व नियोजनाबाबत होणार चर्चा

Video: प्रेमाची तालिबानी शिक्षा! काकाच्या मुलीवर प्रेम जडलं; रागात गावकऱ्यांनी प्रेमीयुगुलांना नांगराला जुंपलं, व्हिडिओ व्हायरल

८ चेंडूंत ६ विकेट्स.. पाच त्रिफळाचीत ! Kishor Kumar Sadhak ने इंग्लंडमध्ये सलग दोन षटकांत घेतल्या दोन Hat-Tricks

Parenting tips: पेराल ते उगवेल, आई वडिलांकडून अशा प्रकारे सवयी शिकतात मुलं

SCROLL FOR NEXT