नागपूर

International Nurses Day : रुग्णांची अविरत सेवा करूनही तुटपुंजा पगार; परिचारिकांची व्यथा

राज इंगळे

अचलपूर (जि. अमरावती) : खासगी रुग्णालय असो की सरकारी परिचारिकांचे (Nurses) जीवन कष्टमय, दु:खप्रद आहे. खासगी रुग्णालयांमध्ये (Private covid Hospital) तर अद्यापही किमान वेतन कायदा (Minimum wage law) लागू झाला नसल्याने तुटपुंज्या पगारात परिचारिका काम करीत असल्याचे चित्र आहे. याकडे शासनाने लक्ष देऊन कोरोनाच्या संकटात (Coronavirus) किमान वेतन कायदा लागू करण्याची गरज निर्माण झाली आहे. (Nurses got very minimum salaries in Amravati)

परिचारिकांना कायद्याचे संरक्षण नाही, नोंदणीकृत अर्हता नसल्याने त्यांना इतरांप्रमाणे मानसन्मान मिळत नाही. कामाच्या ठिकाणी डॉक्‍टर, कम्पाउंडर, कधी कधी रुग्णांकडूनही त्रासाला त्यांना सामोर जावे लागते. एकूणच रुग्णसेवेला सुखापेक्षा दु:खच अधिक असल्याचे चित्र शहरासह राज्यभरात आहे. आधुनिक नर्सिंगच्या जनक फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांचा 12 मे रोजी जन्मदिन. त्यांचा जन्मदिन हा जागतिक परिचारिकादिन म्हणून दरवर्षी वैद्यकीय क्षेत्रात साजरा केला जातो.

परंतु आजही खासगी परिचारिकांच्या समस्यांचे निराकरण झालेले नसल्याचे वास्तव आहे. बाळाचा जन्म झाल्यावर सर्वप्रथम तळहातावर सुरक्षित उचलून घेणारी परिचारिका असते. आईच्याही आधी बाळाला सर्वप्रथम न्हाऊ घालणे, स्वच्छ करणे ही सगळी सेवा परिचारिकाच करते, नंतर जन्मभर रुग्णांना हीच परिचारिका अखंड सेवा देत असते. यातना आणि वेदनांनी तळमळणाऱ्या रुग्णांची शुश्रूषा करणारी, धीर देणारी ती देवदूतच असते. मात्र त्यांच्या समस्यांकडे विशेषत: काही खासगी रुग्णालयात जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येत आहे. बदलत्या काळानुसार खासगी रुग्णालयातील परिचारिकांना भेडसावणाऱ्या समस्यांमध्ये वाढ झाली आहे.

शहरातील रुग्णालयात परिचारिका किमान वेतन कायदा लागू नसल्याने तुटपुंज्या पगारात काम करीत आहेत. कायद्याचे संरक्षण नसल्याने अपमानाचे डोंगरच घेऊन त्या जगत आहेत. ग्रामीण भागात तर त्यांच्यावर लसीकरण, प्रसूती, कुटुंबकल्याण यासारख्या कामांचा बोजा टाकला जात आहे. तरीही एखाद्या व्रतस्थाप्रमाणे परिचारिका आपली भूमिका बजावत आहेत. स्वत:चं दु:ख विसरून रुग्णांच्या वेदनेवर मायेची फुंकर घालत आहेत.

(Nurses got very minimum salaries in Amravati)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

WhatsApp चं Username फीचर वादाच्या भोवऱ्यात, केंद्र सरकारने थेट Meta ला पाठवली नोटीस, तीन दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश

Raigad Accident: पालीत मोठा अनर्थ टळला! खड्ड्यांमुळे एसटी बस रस्त्याखाली घसरली; चालकाच्या प्रसंगावधानाने ४२ प्रवाशांचे प्राण वाचले

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

SCROLL FOR NEXT