नागपूर : कोरोनामुळे क्वारंटाइन करण्यात आलेले तसेच सील केलेल्या परिसरात सर्व्हेक्षण करण्यासाठी गेलेल्या डॉक्टरांवर परिसरातील नागरिकांडून दगडफेक करण्यात येत आहेत. देशभरात अद्याप अशा अनेक घटना घडल्या आहेत. यामुळे रुग्ण सेवा करावी तरी असा प्रश्न डॉक्टरांना पडत आहे. आपल्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांवरही दगडफेक होत असल्याचे उघडकीस येत आहेत. कोरोना विषाणूच्या कठीण काळातही असा प्रकार होत असल्याने नागरिकांना काय म्हणावे, हे समजने कठीण झाले आहे.
कोरोनाने देशात प्रवेश केल्यानंतर उपाययोजनांना सुरुवात झाली. याचाच एक भाग म्हणून तीन मे पर्यंत देशात लॉकडाउन राहणार आहे. यामुळे नागरिकांना घराबाहेरही पडणे कठीण झाले आहे. तरीही कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. यावर लवकर नियंत्रण न मिळविल्यास देशाला कठीण परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो.
नागपुरातही कोरोनाचा संसर्ग झाल्यांची संख्या वाढतच आहे. अचानक रुग्णांची संख्या वाढू लागल्याने प्रशासन चांगलेच हादरले आहे. आजवर नियंत्रणात असलेला रुग्णांचा आकडा 60च्या जवळपास पोहोचला आहे. यामुळे कोरोना विषाणूचा वाढता धोका पाहता प्रशासनाकडून शहरभरात सर्व्हेक्षण केले जात आहेत. घरामध्ये किती लोक राहतात आणि त्यातील कोणाला सर्दी-खोकला, ताप आह का? याबाबतची माहिती घेतली जात आहे.
मात्र, बुधवारी भानखेडा परिसरात सर्वेक्षणासाठी गेलेल्या महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्याला पिता-पुत्राने मारहाण केली. या प्रकरणात तहसील पोलिसांनी मनपाचे अधिकारी सत्येंद्र चंदनखेडे यांच्या तक्रारीवरून भानखेडा कब्रस्तान रोड निवासी अब्दुल रफीक अब्दुल अजीज (60) आणि त्यांचा मुलगा मोहम्मद शफी अब्दुल रफीक (35) यांच्यावर गुन्हा नोंदविला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, मनपा अधिकारी चंदनखेडे आणि त्यांचे पथक बुधवारी सकाळी 9.30 वाजताच्या सुमारास भानखेडा परिसरात कोरोनाचे सर्वेक्षण करीत होते. दरम्यान त्यांनी अब्दुल रफीकच्या घरी जाऊन घरात राहणाऱ्या लोकांची माहिती विचारली. कोणी आजारी आहे का याची माहिती घेत असतानाच रफीकने वाद घालण्यास सुरुवात केली.
एनपीआरचे सर्व्हेक्षण करण्याचा आरोप लावून चंदनखेडे यांना शिवीगाळ केली. धक्के मारत आपल्या घरातून हाकलून लावले. चंदनखेडे यांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पिता-पुत्राने त्यांचे काहीही ऐकून न घेता मारहाण सुरू केली. चंदनखेडे यांनी घटनेची माहिती तहसील पोलिसांना दिली. पोलिसांनी त्यांच्या तक्रारीवरून विविध कलमान्वये गुन्हा नोंदवून रफीकला अटक केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.