Offline meeting for election of Mayor of Nagpur Nagpur Mayor news 
नागपूर

नागपूरचा महापौर : दयाशंकर तिवारी यांना काँग्रेस देणार आव्हान; पाच जानेवारीचा मुहूर्त

राजेश प्रायकर

नागपूर : महापौर निवडणूक प्रक्रियेसाठी पाच जानेवारीचा मुहूर्त ठरला असून, दयाशकंर तिवारी यांना महापौरपदी निवडीची औपचारिकता पार पडणार आहे. परंतु, कॉंग्रेसने दयाशंकर तिवारी यांच्यापुढे आव्हान उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी महापौर निवडीच्या प्रक्रियेसाठी सुरेश भट सभागृहात थेट सभा घेण्यास परवानगी दिली.

संदीप जोशी यांनी महापौरपदाचा राजीनामा दिल्यानंतर निवड प्रक्रिया करण्यात येणार आहे. दयाशंकर तिवारी पुढील महापौर असून विभागीय आयुक्तांनी निवड प्रक्रियेसाठी पाच जानेवारीचा मुहूर्त काढला आहे. परंतु, ऑनलाइन सभेमुळे सारेच निवड प्रक्रियेबाबत चिंतेत होते. कोव्हीड काळात महापालिकेच्या सर्वच सभा ऑनलाइन पद्धतीने झाल्या. एवढेच नव्हे विविध समित्यांच्या बैठकाही ऑनलाइन घेण्यात आल्या होत्या.

महापालिकेची थेट सर्वसाधारण सभा जूनमध्ये झाली होती. त्यानंतर ऑनलाइनवरच भर देण्यात आला. यात अनेक अडचणी येत असल्याने या सभांचा बोजवारा उडाला होता. त्यामुळे महापौर निवडीसाठी थेट सभेची मागणी करण्यात आली होती. अखेर निवडणुकीचे पीठासीन अधिकारी व जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी रेशीमबाग येथील भट सभागृहात थेट सभा घेण्यास परवानगी दिली. परंतु, त्यांनी या सभेदरम्यान कोव्हीडच्या पार्श्वभूमीवर फिजिकल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझर, सभागृहाचे निर्जंतुकीकरण करण्याचे निर्देश दिले.

महापौरपदाच्या निवडीसाठी कॉंग्रेसनेही उमेदवार उभा करण्याची तयारी सुरू केली आहे. १०८ सदस्य संख्येमुळे दयाशंकर तिवारी यांचा मार्ग मोकळा असला तरी कॉंग्रेसने विघ्न उभे करण्याचा निर्णय घेतला. त्यादृष्टीने २९ सदस्य असलेल्या कॉंग्रेसने तयारी सुरू केल्याचे विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनी नमुद केले.

अद्याप उमेदवारांचे नाव निश्चित झाले नसले तरी येत्या एक दोन दिवसांत सर्व सदस्यांसोबत चर्चा करून उमेदवार निश्चित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय या सभेत उपमहापौरपदासाठीही निवडणूक होणार आहे. सत्ताधाऱ्यांकडूनही अजूनही नाव निश्चित केले नाही. परंतु दिव्या धुरडे, चेतना टांक यांचे उपमहापौरपदासाठी नाव चर्चेत आहे.

महापौर निवडीची प्रक्रिया

महापौर, उपमहापौरपदाच्या निवडीची प्रक्रिया ३० डिसेंबरपासून सुरू होणार आहे. ३० डिसेंबरला सकाळी ११ ते ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येणार आहे. त्यानंतर पाच जानेवारीला सभागृहात अर्जाची छाननी केली जाईल. छाननीनंतर अर्ज मागे घेण्यासाठी १५ मिनिटांचा अवधी देण्यात येईल. त्यानंतर निवडणूक प्रक्रिया होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT