Eknath Shinde 
नागपूर

Old Pension: जुन्या पेन्शनबाबत मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत मोठी घोषणा; सरकारी कर्मचारी संप मागे घेणार?

जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी यासाठी राज्यभरात सरकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी यासाठी राज्यभरात सरकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. तसेच नागपुरमध्ये अधिवेशन सुरु असलेल्या ठिकाणी सरकारी कर्मचाऱ्यांनी आंदोलनही पुकारलं आहे.

यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत निवेदन दिलं आहे. यामध्ये त्यांनी एक मोठी घोषणाही केली, त्यामुळं आता हे कर्मचारी आपलं आंदोलन मागे घेण्याची शक्यता आहे. (Old Pension CM Eknath Shinde made big announcement Vidhan Sabha regarding old pension)

अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडणार

मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की, जुन्या पेन्शनसंदर्भातील अहवाल सरकारला प्राप्त झाला असून या अहवालावरील चर्चा आणि अंतिम निर्णय या तत्वाशी सुसंगत असेल. या अहवालावर अंतिम निर्णय येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेण्यात येईल. मी सभागृहाला ग्वाही देतो की, संघटनेंच्या मागण्यांप्रती शासन सकारात्मक आहे. त्यामुळं संघटनेनं सुरु केलेला संप त्वरीत मागे घ्यावा. (Latest Marathi News)

मुख्य सचिवांना दिले निर्देश

श्रीवास्तव समितीनं सुचवलेल्या तरतुदींचा सविस्तर अभ्यास करणं आवश्यक आहे. हा अभ्यास करण्याचे निर्देश अतिरिक्त मुख्य सचिव (वित्त) आणि अतिरिक्त मुख्य सचिव (सेवा) यांना देण्यात आले आहेत. (Marathi Tajya Batmya)

संपावर भाष्य करणार नाही - काटकर

दरम्यान, अद्याप आमच्या राज्य कार्यकारिणीची अंतिम बैठक झालेली नसल्यानं संपावर भाष्य करणार नसल्याचं सरकारी कर्मचारी संघटनेचे विश्वास काटकर यांनी म्हटलं आहे. तसेच संपाची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी सभागृहात हा विषय मांडला हीच आमची जमेची बाजू असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

पेन्शन योजनेसाठी राज्यभर संप

जुन्या पेन्शन योजनेसाठी राज्यभर संप सरकारी कर्मचारी संघटनेनं संप पुकारला आहे. यामध्ये मुंबई, पुणे, नाशिक, रत्नागिरी, अहमदनगर, भंडारा, नागपूर अशा विविध भागात कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rekha Gupta : दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर जीवघेणा हल्ला, जनता दरबार सुरु असताना हल्लेखोर आला अन्...

Satara Rain update:'कराड-पाटण तालुक्यात मुसळधार; कराड-चिपळूण मार्ग वाहतूक बंद, अडकलेले कोकणात जाणारे 150 प्रवासी एसटी बसमधून रवाना

HDFC Bank Alert: HDFC ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; बँकेच्या अत्यावश्यक सेवा दोन दिवस बंद राहणार

Dhanashree Verama: युझवेंद्र चहलच्या 'Sugar Daddy' टी शर्टवर धनश्रीची जोरदार टीका; म्हणाली, मी कोर्टात रडले आणि तो...

Pune Rain Update: पुण्यात पावसाचा हाहाकार! एकता नगरमध्ये पाणी शिरलं, खडकवासल्यातून विसर्ग वाढला

SCROLL FOR NEXT