मेंढला/नरखेड (जि.नागपूर ) : नागपूर जिल्हयात कोरोनाचा कहर वाढतच आहे. कामठीत दरदिवशी दुप्पट रूग्ण वाढत आहेत. त्यातुलनेत नरखेड तालुक्याची संसर्गित रूग्णांची संख्या सदया आटोक्यात आहे. पुढील धोक्याची खबरदारी घेत नगरपरिषद प्रशासनाने 20 ते 15 जुलैदरम्यान जनता कर्फ्यूचे आवाहन केले. शहरात सर्व स्तरातून प्रतिसाद मिळाला. कर्फ्यू सुरू झाला. नागरिकांनी पहिल्या दिवशी केवळ नाममात्र बंद ठेवून पुन्हा दुकानांचे शटर उघडले. आणि कर्फ्यूचा फज्जा उडाला. कुठे माशी शिंकली कोणास ठाउक !
अधिक वाचा : भिवापूर वगळता अख्ख्या नागपूर जिल्हयाला झाला संसर्ग
हे कसले राजकारण ?
नरखेड शहराला कोरोनामुक्त करण्याचा संकल्प करीत नगराध्यक्ष अभिजित गुप्ता यांनी 20 ते 25 जुलै दरम्यान जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. यास प्रतिसाद देत सोमवारी व्यापाऱ्यांनी प्रतिष्ठाने बंद ठेवली. नागरिकही या दिवशी घराबाहेर पडले नाहीत. मात्र शहरातील जनता कर्फ्यूची हवा दुसऱ्या दिवशी उतरली. मंगळवारी बहुतांश दुकाने उघडल्या गेली. व्यापारी संघटनेत फुट पडल्याने नगर परिषद प्रशासनाचा जनता कर्फ्यू फिसकटला असल्याची प्रतिक्रिया थेट जनतेतून ऐकायला येत आहे.
नरखेड शहरात रविवारी चार कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यानंतर त्यावर प्रतिबंधात्मक उपाय करण्यासाठी व बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांची साखळी तोडण्यासाठी रविवारी रात्री नगराध्यक्ष अभिजित गुप्ता यांनी जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. सोमवारी याची नगर परिषद प्रशासनाच्या वतीने शहरात घोषणाही करण्यात आली.
अखेर छुपा अजेंडा फिरविला
आवाहनालाला प्रतिसाद देत सोमवारी संध्याकाळपर्यंत शहरातील संपूर्ण व्यापार बंद राहिला. परंतू या बंदवरही प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले. व्यापाऱ्यांनी छुपा अजेंडा फिरवीत सर्व प्रतिष्ठाने सुरू करण्याचे आवाहन केले. त्यामुळे सर्व बाजारपेठ मंगळवारपासून पूर्ववत सुरू झाली. तालुक्याला चारही बाजूंनी कोरोना महामारीने विळख्यात घेतले आहे. पांढुर्णा, सावनेर, काटोल, वरुड येथे मोठ्या प्रमाणात रुग्ण असताना शहरातील प्रत्येक नागरिकाने दक्ष राहून प्रशासनास सहकार्य करणे गरजेचे आहे. त्यातही राजकारण म्हणजे नागरिकांच्या आरोग्याशी खेळल्यासारखे होईल.
अधिक वाचा : दहावी-बारावीच्या फेरपरीक्षा कधी?
प्रशासनास सहकार्य करणे गरजेचे होते
आरोग्य विभाग, खासगी दवाखान्याचे डॉक्टर यांनी एक आठवडा लॉकडाऊन करण्याचा सल्ला दिला होता. व्यापारी संघटनेच्या अध्यक्षांसोबत चर्चा करुन पाच दिवसांच्या जनता कर्फ्यूचा निर्णय घेतला होता. परंतू व्यापाऱ्यांनी याकडे साफ दुर्लक्ष केले. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ खेळला जात आहे. अशात नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करणे गरजेचे आहे.
-अभिजित गुप्ता
नगराध्यक्ष, नरखेड
संपादन : विजयकुमार राऊत
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.