one died and other injured in accident at tekadi of nagpur 
नागपूर

शेतात फेरफटका मारून परतत होते कामावर, पण वाटेतच काळाने घातली झडप

सतीश घारड

टेकाडी  ( जि. : नागपूर )  : शेतातील काम आटोपून घरी जात असताना गोंडेगाव वेकोली खुल्या कोळसा खाण परिसरातील गुप्ता कोल वाशरीजवळ कोळशाने भरलेल्या ट्रकने दुचाकीला धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी आहे. त्याच्यावर नागपुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना रविवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली.

धनराज कुंभलकर (४३), असे मृताचे नाव असून गोविंद दाढे हे गंभीर जखमी झाले आहेत. दोघेही वेकोल कर्मचारी असून गोंडेगाव खुल्या कोळसा खाणीत कार्यरत होते. येसंबा शिवारातच कुंभलकर यांची शेती असल्याने दोघेही मित्र एकाच दुचाकीवर शेतात फेरफटका मारण्यास गेले. सायंकाळी पाचच्या सुमारास शेतातून परत येताना कुंभलकर आणि त्यांचे मित्र दोघेही दुचाकीने घराकडे जाण्यास निघाले. दरम्यान, गोंडेगाव खाणीतील कोळसा ट्रकमध्ये भरून डुमरी सायडिंग येथे वाहून नेला जातो. दरम्यान, गुप्ता कोल वाशरी नजीक समोरून अनियंत्रित झालेल्या कोळसा भरलेल्या ट्रकने दुचाकीला जबर धकड दिली. धडक इतकी जबर होती की यात धनंजय कुंभलकर यांच्या डोक्याचा चेंदामेंदा झाल्याने घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला. गोविंद दाढे हे गंभीर जखमी झाले. 

दरम्यान, ट्रक चालकाने घटनास्थळावरून पळ काढला होता. घटनेची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरताच नागरिकांनी एकच गर्दी केली. कन्हान पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत कामठी उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. जखमीला नागपूर येथे खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. घटनेचा पुढील तपास कन्हान पोलिस करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic : पुण्यातील सिंहगड रोड, वारजेत वाहनांच्या लांबच लांब रांगा, अमित शहा यांच्या दौऱ्यामुळे वाहतूक वळवल्याने वाहतूक कोंडी

Kolhapur Rain Weather : कोल्हापुरातील सहा धरणांतून १२ हजार क्युसेक विसर्ग, राधानगरी धरण ७० टक्क्यांवर; पावसाचा जोर वाढणार

अधिवेशनात खंडाजंगी! अत्याचार प्रकरणातील गुन्हेगारांना अटक करा: आमदार रोहित पवार आक्रमक; पोलिसांवर कोणाचा दबाव?

Latest Maharashtra News Updates : छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात, मंदिरासमोर भाविकांना कारने चिरडले

Ashadhi Ekadhashi 2025: यंदा 5 की 6 जुलै कधी आहे आषाढी एकादशी? जाणून घ्या शुभ मुहुर्त अन् पूजा करण्याची विधी

SCROLL FOR NEXT