one died and other injured in car accident in saoner of nagpur 
नागपूर

भरधाव कारने जात होते जावई अन् मेहुणा, गाडीवरील नियंत्रण सुटले अन् घडला मृत्यूचा थरार

विजयकुमार राऊत

सावनेर : भरधाव कारवरील ताबा सुटल्याने कार अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात उलटल्याची घटना घडली. यामध्ये एकाचा मृत्यू झाला, तर एक गंभीर जखमी झाला. सावनेर पोलिस ठाण्याच्या हद्दीतीतल आयटीआयपुढील यशवंत बाबा झोपडपट्टीजवळ रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली.

रवी सत्यानारायण पुरे (वय २८, रा. म्हस्के लेआऊट वाघोडा )असे मृताचे, तर लोकेश प्रकाश वैद्य (वय २२, बर्डी नागपूर), असे जखमीचे नाव आहे. रवी हा त्याच्या मेहुण्यासोबत गडकरी चौकातून कार घेऊन कळमेश्वरच्या दिशेने जात होते. कार भरधाव होती. त्यातच चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. त्यामुळे कार रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात उलटली. त्यात कारमधील दोघेही गंभीर अवस्थेत पडल्याने परिसरातील नागरिकांनी पोलिसांना कळविले. त्यानंतर त्यांना सावनेर येथील शासकीय रुग्णालयात नेले असता रवी मृत घोषित केले. तसेच लोकेशला नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले. रवीचा मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला. याप्रकरणी सावनेर पोलिसांनी नोंद करून तपास सुरू केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सतीश पाटील करत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gyanesh Kumar Resignation : कॉकरोच जनता पार्टी निवडणूक आयुक्त ग्यानेश कुमार यांच्याविरोधात रस्त्यावर उतरणार; गांधी जयंतीला देशव्यापी आंदोलनाचा इशारा

Drought in Maharashtra : दुष्काळाच्या झळा; दोन शेतकऱ्यांनी गमावला जीव, लातूर आणि सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

२४ किलो वजन घटवलं! वनिता खरातने सांगितलं डाएटचं सीक्रेट; म्हणाली, ‘आज माझा चीट डे’

Maharashtra Ganesh Visarjan Live: मिरजेतील पहिल्या गणपतीचे विसर्जन; नदीवेस शिवाजी गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुकीसाठी गणेश तलावावर जय्यत तयारी

Soybean Crop: व्यथित शेतकऱ्याने पेटवून दिले सोयाबीनचे पीक

SCROLL FOR NEXT