bv 
नागपूर

नागपूर महापालिका निवडणूक: प्रभाग एका की दोन वार्डांचा? महाविकास आघाडीमध्येच मतभेद

राजेश चरपे

नागपूर ः महापालिकेचा प्रभाग एका की दोन वॉर्डाचा हवा या वरून राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादीला वॉर्डनिहाय निवडणूक हवी असून काँग्रेसला दोन वॉर्डांचा प्रभाग हवा आहे.

वर्षभरानंतर नागपूर महापालिकेची निवडणूक होऊ घातली आहे. सध्या शहरात चार वॉर्डांचा एक प्रभाग आहे. मागील निवडणुकीत भाजपला प्रभाग पद्धती चांगलीच पोषक ठरली. त्यांचे तब्बल १०८ नगरसेवक निवडूण आले. सर्वात मोठा पक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काँग्रेसचा गाडा २९ नगरसेवकांवर अडला. शिवसेना दोन आणि आणि राष्ट्रवादी एका नगरसेवकांवर येऊन ठेपली. आपले अस्तित्व शाबूत राहावे यासाठी महाआघाडीतील तीनही पक्षांनी प्रभागपद्धती रद्द करावी अशी जोरदार मागणी सत्तेवर आल्याबरोबरच केली होती. 

महाविकास आघाडीने तसा निर्णयसुद्धा घेतला. विधानसभेत ठरावसुद्धा पारित केला. आता फक्त दोन की एक वॉर्ड एवढाच निर्णय अंतिमक्षणी राज्य सरकारला घ्यायचा आहे. किमान एक जास्तीत जास्त दोन वॉर्डांचा प्रभाग असे विधेयक राज्य सरकारने पारित केले आहे. नागपूर शहरात राष्ट्रवादी आणि शिवसेनेची ताकद मर्यादित आहे. 

काही वस्त्यांमध्येच त्यांचे उमेदवार निवडूण येऊ शकतात अशी परिस्थिती आहे. त्यामुळे दोनचा प्रभाग केल्यास अडचणी येतील, उमेदवार पराभूत होतील अशी भीती इच्छुकांना वाटत आहे. त्यामुळे एकल प्रभागानुसार निवडणूक घेण्याची मागणी शिवसेना आणि राष्ट्रवादीची आहे. दुसरीकडे काँग्रेसला दोन वॉर्डाचा प्रभाग हवा आहे. त्यामुळे अधिक नगरसेवक निवडणूक येतील आणि उमेदवारी वाटप करताना अडचण जाणार नाही असा होरा काँग्रेसचा आहे. याशिवाय महिला उमेदवारीची अडचणही यामुळे दूर होऊ शकते असा दावाही काँग्रेसचा आहे.

अनेक दिग्गजांची अडचण

महापालिकेत ५० टक्के महिला आरक्षण आहे. त्यानुसार दीडशेपैकी ७५ वॉर्ड महिलांसाठी सोडावे लागणार आहेत. त्यामुळे जागा वाटपाचा स्कोप आधीच संकुचित झाला आहे. महिला आरक्षणामुळे अनेक दिग्गजांची अडचण होऊ शकते. याशिवाय अनुसूचित जाती जमातीचे आरक्षणामुळे अनेक राखीव ठेवावे लागणार आहे. दोनचा प्रभाग राहिल्यास सोयीनुसार पदाधिकारी, विद्यमान नगरसेवक, प्रभागातील दिग्गज उमेदवारांना ॲडजेस्ट करता येऊ शकते. त्यामुळे प्रभाग करताना दोन वॉर्डाचा समावेश करावा, अशी काँग्रेसची मागणी आहे. 

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT