one more FIR filed against Sahil sayyad read full story  
नागपूर

साहील सैयदचा पाय खोलात, आणखी एक गुन्हा, वाचा काय आहे प्रकार... 

अनिल कांबळे

नागपूर : ठगबाज साहील सैयद 1991 पासूनच गुन्हेगारी कारावायांमध्ये सक्रिय आहे. साहीलने आपल्या टोळीच्या माध्यमातून एका मशिदीच्या कमिटीच्या अध्यक्षाचा कोट्यवधी रुपये किमतीचा भूखंड बनावट दस्तावेज तयार करून बळकावला होता. त्या जागेवर टोलजंग इमारत बांधून कब्जा केला होता. याप्रकरणी आता मानकापूर पोलिस ठाण्यात साहील सैयद आणि त्याच्या टोळीवर आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साहील सैयद मोठमोठ्या नेत्यासोबत काढलेल्या फोटोचा गैरवापर करीत दबावतंत्राचा वापर करीत होता. त्याने भूखंड हडपणारी टोळी तयार केली होती. टोळीच्या माध्यमातून आतापर्यंत साहील सैयदने कोट्यवधी रुपये किंमत असलेले भूखंड बळकावले आहे. तसेच पिस्तूल डोक्‍यावर ठेवून जीवे मारण्याची धमकी देत अनेकांचे भूखंड आपल्या नावे केले आहेत. 

फिर्यादी शारिक परवेज छोटे साहाब (रा. सतरंजीपुरा) यांचा भूखंड बगदादीयानगर, झिंगाबाई टाकळी येथे होता. 1991 साली आरोपी साहील सैयद खुर्शिद सैयद (रा. झिंगाबाई टाकळी) याने साथीदार इस्माइल खान मनसव खान (शांतीनगर) आणि शेख इस्माईल शेख चॉंद (रा. नजीब मंजील तकिया दिवानशहा नालसाहब चौक) यांनी संगनमत करून शारीक परवेज यांच्या भूखंडाचे बनावट दस्तावेज तयार केले. त्या दस्तावेजाचा वापर करून भूखंड बळकावला. त्या भूखंडावर अवैधरीत्या कब्जा करून बांधकाम केले. शारीक परवेज भूखंडावर गेले असता साहील सैयद आणि त्याच्या साथीदारांनी भूखंडाचा ताबा विसरण्यास सांगितले. 

पुन्हा भूखंडावर पाय ठेवल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. साहील सैयद शहर पोलिस दलातील पोलिस अधिकाऱ्यांसोबत पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतानाचे फोटो दाखवून ब्लॅकमेल करीत होता. त्यामुळे त्यावेळी मानकापूर पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिल्यानंतरही कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती. त्यामुळे शारीक परवेज यांनी गुन्हे शाखेचे उपायुक्‍त गजानन राजमाने यांच्याकडे तक्रार केली. तक्रारीवरून साहिल सैयदसह तिघांविरूद्ध मानकापूर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. 

साहीलची अलिशान कार जप्त 

ब्लॅकमेलर सैयद साहील याची संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली आहे. साहीलची अलिशान कार गुन्हे शाखा पोलिसांनी जप्त केली. तसेच साहिलची व्हायरल झालेली ऑडिओ क्‍लिपची सत्यता पडताळणी करण्यासाठी आवाजाचे नमुने घेण्यात आले. त्यामुळे आता साहील सैयदविरुद्धचा कारवाईचा फास दिवसेंदिवस अधिक घट्ट होत आहे. 
 
संपादन - अतुल मांगे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nandigram Bypoll : नंदीग्राम पोटनिवडणुकीआधी मोठी घडामोड; काँग्रेस उमेदवार मिलन प्रधान यांच्यानंतर पक्षातील बड्या नेत्यालाही अटक

Pune University Mess Fee Hike: पुणे विद्यापीठातील मेस दरवाढीचा भार विद्यार्थ्यांवर नको; विद्यापीठाने अनुदान द्यावे: ‘विद्यार्थी संघर्ष कृती समिती’ची मागणी

Chhatrapati Sambhajinagar crime control: दहशत माजवणाऱ्या संदिप फटाकडेला छ. संभाजीनगर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार

Marathi News Live Updates : बुलढाण्यात कंटेनर-दुचाकीचा भीषण अपघात; मायलेकाचा जागीच मृत्यू

Sugarcane Mechanization: ऊसतोड मजुरांच्या मनमानीला कंटाळून शेतकऱ्यांचा यंत्रांकडे मोर्चा; आधुनिक हार्वेस्टरमुळे वेळ व खर्चात बचत

SCROLL FOR NEXT