one year completed to janata curfew due to corona outbreak 
नागपूर

जनता कर्फ्युची आज वर्षपूर्ती, टाळ्या-थाळ्या वाजवल्यामुळे कर्फ्युचा उडाला फज्जा; श्रद्धा की अंधश्रद्धा?

राजेश प्रायकर

नागपूर : मागील वर्षी नागपूरकरांनी सकाळी सात ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत घरी राहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जनता कर्फ्यूच्या आवाहनाला प्रतिसाद दिला. परंतु, अद्यापही सायंकाळी पाच वाजता टाळ्या, थाळ्या वाजविण्याच्या नादात उपाययोजनांकडे दुर्लक्ष झाल्याने कोरोना देशात फोफावला. विज्ञानाच्या युगात टाळ्या,थाळ्या वाजविल्याने कोरोना जातो असे म्हणने कितपत योग्य, असे प्रश्न अनेकांनी उपस्थित केले आहेत. 

मागील २२ मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर शहरातही जनता कर्फ्यू पाळण्यात आला. आज या घटनेला एक वर्ष पूर्ण होत आहे. वर्षभरात कोरोनाने शहरात २ हजार ९७६ मृत्यू झाले तर १ लाख ५६ हजार ७७५ जणांना कोरोना झाला. मागील वर्षी शहरात सायंकाळी टाळ्या, थाळ्यांसह शंखनादानेही शहर निनादले. टाळ्या, थाळ्या वाजविल्यावरून मागील वर्षीही अनेकांचे वेगवेगळे मत होते. काही नागरिकांनी टाळ्या, थाळ्या वाजविण्याऐवजी घरातच राहून कोरोनाचा संसर्ग टाळण्यावर भर दिला. त्याचवेळी शहरात अनेक भागात टाळ्या वाजविण्यासाठी अनेकजण एकत्र बाहेर पडले. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जाच उडाला. सोशल मिडियावरही याबाबत समर्थक आणि विरोधकांत 'पोस्टयुद्ध' रंगले होते. टाळ्या, थाळ्या वाजविण्यास एक वर्ष पूर्ण होत आहे. मात्र, अनेकांना ही युक्तीच पटली नसल्याचे दिसून येते. शहरातील विधीतज्ज्ञ अ‌ॅड. अक्षय समर्थ यांनी तर हा अंधविश्वास असल्याचे नमुद केले. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्यावेळी विदेशातून येणारी विमाने बंद करणे, विमानतळे बंद करणे गरजेचे होते. विमानातून मोठ्या प्रमाणात देशात कोरोना वाढल्याचे त्यांनी सांगितले. टाळ्या, थाळ्या वाजविण्याऐवजी उपाययोजनांवर भर देण्यास घाई करण्याची गरज होती, असेही ते म्हणाले. 

थाळी वाजविणे दळभद्रीपणाचे लक्षण ? 
एखाद्याच्या घरात दुष्काळ पडला असेल तर थाळी वाजविली जाते. थाळी वाजविल्यानंतर अनेकांच्या घरात वर्षभरापासून दुष्काळ पडला, असा टोला व्यावसायिक गजेंद्र लोहिया यांनी लगावला. टाळी, थाळी वाजविल्याने कोरोना गेला काय? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. कोरोनामुळे निराशाजनक चित्र निर्माण झाले होते. त्यामुळे नागरिकांचे लक्ष यावरून हटविण्यासाठी हा प्रयोग होता, असे अमित बांदुरकर म्हणाले. शंखध्वनीने बॅक्टेरिया नष्ट होतात, हे ठिक आहे. पण टाळ्या, थाळ्या वाजविण्यासाठी रस्त्यांवर येऊन जल्लोष करणे, मिरवणूक काढून गर्दी करणे योग्य नव्हतेच. त्यानंतर शहरात लॉकडाऊनच्या काळातही कोरोनाबाधित वाढल्याचे बांदुरकर म्हणाले. 

सोशल मीडियावर अद्यापही थट्टा - 
मागील वर्षीही सोशल मीडियावर टाळ्या, थाळ्या वाजविल्याचे पडसाद उमटले होते. आता लसीकरण सुरू झाल्यानंतर अनेकजण फोटो सोशल मीडियावर शेअर करीत आहे. यावरही काहींनी सोशल मीडियावर टाळ्या वाजविणाऱ्यांची थट्टा केल्याचे दिसून येते. टाळ्या-थाळ्या वाजवून कोरोनाला पळवून लावणारे आता लसीकरणाचे फोटो टाकत आहे, अशी पोस्ट काहींनी टाकली आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video : समोरा समोर दोन बसची भयानक टक्कर; अपघाताचा थरारक व्हिडिओ व्हायरल, पाहून शॉक व्हाल..

IND vs ENG 2nd Test : रवींद्र जडेजाने 'तलवार' उपसली! कपिल देव यांचा विक्रम मोडला, Sobers सारख्या दिग्गजांसोबत जाऊन बसला

Latest Maharashtra News Updates : महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेकडून बाळासाहेब लांडगे यांचं निलंबन

बाबा वेंगाचं भाकीत खरं ठरणार? पुढच्या 6 महिन्यात 'या' 4 राशी करोडपती होणार? कोणत्या त्या राशी जाणून घ्या...

Pune Accident: बसची वाट बघत उभे होते, तेव्हाच टेम्पो काळ बनून आला अन्..., दोघांचा जागीच मृत्यू, घटनेने पुण्यात खळबळ

SCROLL FOR NEXT