Online Class Sakal
नागपूर

विदर्भातील शाळा २८ जूनपासून सुरू, पण वर्ग ऑनलाइनच

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कोरोनाचा लाट (corona wave) ओसरली असली तरी धोका मात्र काय आहे. त्यामुळे विदर्भातील नव्या शाळांच्या सत्राची सुरुवात (school starts in vidarbha) ही ऑनलाइन क्लासरुमने होणार आहे. २८ जूनपासून विदर्भातील शाळा सुरू करण्यात येणार आहे. (online schools starts from 28 june in vidarbha)

कोरोनामुळे मागील वर्षापासून शाळा बंद असून विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. पहिल्यांदाच दहावी व बारावीच्या परीक्षा रद्द करण्याची वेळ आली आहे. वर्गात न जाता व परीक्षा न देता विद्यार्थी वरच्या वर्गात पोहोचले आहेत. दरम्यान, विदर्भ वगळता राज्यातील शाळा १६ जूनपासून सुरू झाल्या असून २८ जूनपासून विदर्भातील शाळा सुरू होणार आहेत. मात्र, अद्याप शाळा कशा पद्धतीने सुरू होणार याची शिक्षक, विद्यार्थी व पालकांना उत्सुकता लागली आहे. शिक्षण विभागाने शाळांना पत्र पाठवून विद्यार्थ्यांना शाळांत बोलावू नये याशिवाय विद्यार्थ्यांना ऑनलाइन व इतर उपक्रमाच्या माध्यमातून शिकवावे असे नमूद केले आहे.

शिक्षकांना उपस्थित राहण्याच्या सूचना -

शिक्षण विभागाने शाळांना पाठविलेल्या पत्रानुसार, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या सर्व मुख्याध्यापकांची १०० टक्के उपस्थिती अनिवार्य आहे. १० वी व १२ वीच्या शिक्षकांची १०० टक्के उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. तर शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची १०० टक्के उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. मात्र, १ली ते ९वी च्या शिक्षकांची ५० टक्के उपस्थिती अनिवार्य असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News : नाशिक रोडवरील चोरट्यांनी आर्मी नर्सिंग परीक्षेला आलेल्या उमेदवाराला लुटले; एक लाख पाच हजारांचा ऐवज जप्त

Radhika Yadav Murder Case: राधिका यादव हत्याकांडात नवी ट्विस्ट!, टेनिस अकादमीबद्दल पोलिसांनीच केला मोठा खुलासा

Latest Marathi News Updates : उल्हासनगर स्मशानभूमीत डॉ. आंबेडकरांचा पुतळा; अनुयायांमध्ये संतापाची लाट

Nashik News : नाशिकला दिलासा! पावसाने उसंत घेतल्याने गंगापूर धरणाचे दरवाजे बंद; पूरस्थिती निवळली

महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण! 'शिवरायांच्या किल्ल्यासाठी PM मोदींनी केले विशेष प्रयत्न'; UNESCO च्या मानांकनानंतर काय म्हणाले फडणवीस?

SCROLL FOR NEXT