नागपूर : वादळामुळे सोमवारी बुटीबोरी परिसरातील वीज यंत्रणेचे मोठे नुकसान होऊन वीजपुरवठा (power supply) विस्कळीत झाला होता. महावितरणने (MSEB) युद्धस्तरावर दुरुस्ती कार्य हाती घेतले. परिसरातील ऑक्सिजन प्लांट (oxygen plant) आणि कोविड रुग्णालयाचा (covid hospital) वीजपुरवठा पुन्हा बहाल करीत बाधितांना दिलासा दिला. अन्य भागातील पुरवठाही तत्परतेने पूर्ववत केला. (oxygen plant and covid hospital power supply is smooth now says MSEB)
सोमवारी सायंकाळी वादळाने ग्रामीण भागाला तडाखा दिला. लॉकडाउनमुळे वीजग्राहक घरीच आहेत. अशात वीजपुरवठा तातडीने सुरळीत करणे गरजेचे होते. कोरोना रुग्णांना ऑक्सिजनची गरज असतानाच ऑक्सिजन प्लांट असलेल्या बुटीबोरीतील आसी गॅस कंपनीचा तसेच कोरोनाचे रुग्ण असलेल्या शालिनीताई मेघे रुग्णालयाचा वीजपुरवठाही खंडित झाला होता. बुटीबोरी विभागाचे कार्यकारी अभियंता प्रफुल लांडे यांनी नुकसान झालेल्या भागात पाहणी केली. वादळ शमताच दीड तासाच्या आत वीजपुरवठा सुरळीत करून उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधितांना दिलासा दिला.
वादळामुळे बुटीबोरी एमआयडीसी आणि आकाशवाणी वीज उपकेंद्राचा वीजप्रवाह खंडित झाला होता. दोन्ही वीज उपकेंद्रातून परिसरातील औद्योगिक वसाहती सोबतच निवासी ग्राहकांना वीज पुरवठा करण्यात होतो. हिंदुस्थान कंपनी, इंडोरामा गेटजवळ वीज वाहिनीवर झाड पडले होते. मोदी गोल्ड कंपनीजवळ, बुटीबोरी बगीच्याजवळ जंपर तुटल्याचे आढळून आले. महावितरणकडून तत्काळ उपाययोजना करण्यात आल्याने रात्री १० वाजता बऱ्याच भागातील वीजपुरवठा सुरळीत करण्यात यश आले. टाकळघाट आणि बुटीबोरी शाखा कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या विविध भागातील १२ लघुदाब पोल आणि ७ उच्च दाब पोल वादळामुळे वाकले होते. तत्काळ उपाययोजना करीत वीजपुरवठा सुरू केला. या तत्परतेसाठी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, बीएमएचे अध्यक्ष प्रदीप खंडेलवाल यांनी महावितरणचे कौतुक केले आहे.
रामटेक भागातही नुकसान -
रामटेकजवळील आरोली, नगरधन, मनसर, चाचेर, तारसा, धानला, बोरगाव, रेवराल येथील ८० लघुदाब पोल व २५ उच्चदाब पोल व ५ रोहित्र यांचे नुकसान झाले. याभागातील विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे काम मंगळवारी सुरू होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.