Pachkhedi village got a new identity as Ishwardham 
नागपूर

एका सत्पुरुषामुळे गावाला मिळाली ‘ईश्वरधाम’ अशी ओळख; हे गाव आहे तरी कोणते?

गुरुदेव वनदुधे

पचखेडी (जि. नागपूर) : नागपूर जिल्ह्यातील पारडी ग्रामपंचायतअंतर्गत येत असलेले पचखेडी गाव अध्यात्मिकदृष्ट्या धार्मिक व भक्तिमय झाले आहे. गाव व्यसनमुक्त व तंटामुक्त झाले आहे. इथे सर्वच जाती धर्माचे लोक एकजुटीने व एकोप्याने राहतात. एकमेकांच्या सुखात तर सहभागी होतातच पण दुःखातही सहभागी होतात. असे हे छोटेसे गाव आता ‘ईश्वरधाम’ म्हणून ओळखले जाते. याला निमिख ठरले हभप ईश्वर महाराज मंदिरकर...

हभप ईश्वर महाराज मंदिरकर यांनी ४२ वर्षांपासून भागवत सप्ताह करून नागरिकांना भक्तिमार्गात सामावून घेतले आहे. त्यांच्या शिकवणुकीमुळेच गावातील लोकांनी तामसी वृत्ती सोडली. गाव व्यसनमुक्त झाले व तंटामुक्त झाले. इथे सर्वच जाती धर्माचे लोक एकजुटीने व एकोप्याने राहतात. ईश्वरधाममध्ये महादेवाचे मोठे मंदिर आहे. याच मंदिराच्या माध्यमातून महाराज दरवर्षी भागवत सप्ताह करतात.

गावात अनेक सुधारणा झालेल्या आहेत. सांडपाण्याच्या निचऱ्यासाठी व गाव रोगराई मुक्त ठेवण्यासाठी भूमिगत नाल्यांचे बांधकाम करण्यात आले आहे. भूमिगत लाईटची सोय करण्यात आली आहे. सर्वत्र कोरोनाचा प्रकोप सुरू असताना गावात एकही रुग्ण आजपर्यंत आढळून आलेला नाही. हभप ईश्वर महाराज यांनी गावाला लावलेली शिस्त व धार्मिक कार्याची ओढ यामुळे गाव सुजलाम-सुफलाम झाले आहे. यामुळेच की काय गावकऱ्यांनी गावांचे पचखेडी नाव बदलून ‘ईश्वरधाम’ केले आहे.

महाराज दररोज भक्तांना नवनवी शिकवण देत असतात. नुकत्याच संपलेल्या अधिकमासात (पुरुषोत्तम मास) दूरदूरून भक्तगण येथे आले. कारण, या गावाला लागूनच उत्तरवाहिनी बारमाही वाहणारी आमनदी आहे. या नदीत आंघोळ करून मंदिरात भगवान शंकराचे दर्शन घेणे व महारांजाचा आशीर्वाद घेण्यासाठी भाविकांची मांदियाळी येत होती. एकंदरीत हभप ईश्वर महाराजाच्या सान्निध्याने गाव धार्मिक व भक्तिमय झाले आहे.

संस्कार घडविण्याचे कार्य निरंतर

भागवत सप्ताहात महाराजांचे शिष्य आणि १० कि.मी. परिसरातील भाविक सहभागी होतात. येथे दररोज सायंकाळी सत्संग होतो. सत्संगात गावातील लोक एकत्र येऊन देवाचे नामस्मरण करतात. उन्हाळ्यात बाल संस्कार शिबिराचे आयोजन करून लहान बालकांच्या मनावर संस्कार घडविण्याचे कार्य निरंतर सुरू आहे.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price Today : पेट्रोल- डिझेलचे दर आज पुन्हा बदलले, तुमच्या शहरात काय आहे ताजा दर? जाणून घ्या एका क्लिकवर

मुंबई-पुणे फक्त दीड तासात, तर मुंबई-पुणे-बंगळुरू साडे पाच तासात; गडकरींनी सांगितला मास्टरप्लॅन

IND vs SA 3rd T20I : गिल, सूर्यकुमारच्या फॉर्मकडे लक्ष; भारत-आफ्रिका यांच्यामध्ये आज तिसरा टी-२० सामना, कशी असेल Playing XI?

Kolhapur IT Park : अखेर कोल्हापूरला ‘आयटी पार्क’चा मार्ग मोकळा! जागा हस्तांतर निर्णयावर लवकरच शिक्कामोर्तब

Pune Cold Wave: पुणे परिसरात थंडीचा कडाका कायम; पाषाणात किमान तापमान ८.३ अंशांवर

SCROLL FOR NEXT