people and super spreaders are violate lockdown rules in nagpur 
नागपूर

दुकाने बंद, पण 'सुपर स्प्रेडर' रस्त्यावर, पोलिसांची कारवाई धडाक्यात; नागरिकांची मनमर्जी कायम

अनिल कांबळे

नागपूर : पालकमंत्र्यांनी शहरात सात दिवसांचा कडकडीत लॉकडाउन जाहीर केला. परंतु, पोलिस आणि मनपाच्या कारवाईला न जुमानता नागरिक रस्त्यांवर घोळके करीत फिरत आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता दुपारी एकनंतर दुकाने बंद झाली, तरी कोरोनाचे काही ‘सुपर स्प्रेडर’ मात्र रस्त्यांवर बिनधास्त फिरत असल्याचे चित्र आहे. यामुळे रुग्णांच्या संख्येत घट होण्याऐवजी सतत वाढ होत आहे. 

बुधवारी दुपारी १ वाजतापासून दुकाने आणि प्रतिष्ठाने बंद करण्याचा निर्णय मनपाने घेतला. त्यानुसार दुकाने बंदही झालीत. त्यामुळे दुपारी १ नंतर अत्यावश्‍यक सेवेव्यतिरिक्त कुणीही फिरताना दिसू नये, अशी अपेक्षा होती. मात्र, नागपूरकर व्यक्तिगत कामासाठी रस्त्यावर बिनधास्तपणे फिरताना दिसत होते. पोलिस त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी गेल्यानंतर ते पळ काढत होते. ज्या चौकात पोलिस आहेत, त्या चौकातून 'यू-टर्न' घेऊन दुसऱ्या रस्त्याने जाणाऱ्यांची मोठी संख्या होती. पोलिसांचा ताफा जाताच काही भागातील नागरिक पुन्हा घोळका करून रस्त्यावर अथवा फुटपाथवर गप्पा करताना दिसत होते. 

कामगार, व्यापारी, कर्मचारी घरात बसून असताना टवाळखोर मात्र रस्त्यावर होते. काही टवाळखोर दारू आणि गुटख्याच्या शोधात फिरत असल्याचेही दिसत आहे. दारूचे दुकान असलेल्या परिसरात टवाळखोरांची जत्रा कायम असते. यामुळे नागरिकांमधील पोलिसांची भीती कमी झाली का, असा प्रश्नही निर्माण होऊ लागला आहे. 

पोलिसांकडून थोडी सूट दिली जात असताना अनेकांनी विनाकारण घराबाहेर पडणे सुरू केले आहे. रात्री आठ वाजतापासून शतपावली करण्यासाठी अनेक जण रस्त्यावर, मैदानावर दिसू लागले आहेत. मनपा आणि पोलिसांच्या नाकर्तेपणामुळेच लॉकडाउनचा फज्जा उडाला आहे. जर पहिल्या दिवसांपासूनच कडक कारवाई केली असती तर कोरोनाचे रुग्ण वाढले नसते, अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे. पोलिसांनी कठोर कारवाई केल्यास कोरोनाचा प्रसार थांबू शकतो. त्यासाठी पोलिसांनी गांभीर्य दाखविणे गरजेचे आहे. कोरोनाचे वाहक रस्त्यांवर फिरणार असतील तर लॉकडाउनमध्ये फक्त दुकाने बंद करून उपयोग नाही. 

पोलिसांनी केली कारवाई -

  • ८२४ वाहने जप्त 
  • ८२० मास्क नसणाऱ्यांवर कारवाई 
  • ६३२ शारीरिक अंतर न पाळणारे 
  • ४१ लॉकडाउनचे उल्लंघन करणे 
  • २५ खासगी कार्यालयात अतिरिक्त उपस्थिती 
  • १ सुपर मार्केट सील 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Mitkari: ‘भूमिपुत्रांना रोजगार द्या, त्यांचं आयुष्य समृद्ध करा’; आ. अमोल मिटकरी यांची विधान परिषदेत ठाम मागणी

Manoj Kayande : अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या; आमदार मनोज कायंदे यांची अधिवेशनात मागणी

KDMC Revenue Department : कल्याण - डोंबिवली खाडी किनारी महसूल विभागाची कारवाई; 30 लाखांचा मुद्देमाल केला नष्ट

"मृत्युपत्र तयार ठेवलंय" एअर इंडियाने प्रवास करणाऱ्या अभिनेत्याची पोस्ट व्हायरल, म्हणाला..

Latest Maharashtra News Updates : सोमनाथच्या मृत्यू संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT