people in Nagpurs narendra nagar are in problem of daily load shedding  
नागपूर

आम्हालाच सततच्या बत्तीगूलची शिक्षा का? नागपूरच्या 'या' भागातील नागरिकांचा संतप्त सवाल...

योगेश बरवड

नागपूर : देशाला शंभर टक्के लोडशेडींगमुक्त करू असे आश्वासन सरकारकडून देण्यात आले आहे. मात्र प्रत्यक्षात आतापर्यंत किती गाव आणि शहरे लोडशेडिंगमुक्त झाली आहेत हा प्रश्न आता नागरिकांसमोर उभा ठाकला आहे. लहान गावांमध्ये तर ही समस्या आहेच मात्र आता राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरातही सततच्या लोडशेडिंगमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.   

विजपुरवठा सातत्याने खंडित होत असल्याने नरेंद्रनगरच्या काही भागातील नागरिक अगदी मेटाकुटीस आले आहेत. चार महिन्यांपासून रोजच दिवसातून दोन ते तीन वेळा वीज जाते. आम्हाला सततच्या बत्तीगूलची शिक्षा का, असा जळजळीत सवाल त्रस्त नरेंद्र नगरवासियांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा - काळ्या तांदळाचा भात कधी खाल्ला का; आरोग्यासाठी सर्वोत्तम, हे आहेत फायदे...
 
नरेंद्रनगरातील शिल्पा सोसायटी तशी जुनीच वसाहत आहे. मात्र मार्च महिन्यापासून या भागात दररोज वीज जाऊ लागली आहे. वारंवारीता फारच वाढल्याने तक्रारींचा क्रम सुरू झाला. त्यामुळे समस्या मार्गी लागेल असा नागरिकांचा समज होता. पण, महावितरणने तो अगदी चुकीचा ठरविला. 

सकाळ, दुपार आणि रात्री अशा तिन्ही सत्रात नियमित वीजपुरवठा खंडित होतो. दरवेळी अर्धा ते एक तास वीज बंद असते. ऐन कामाच्या वेळीच वीज नसल्याने रहिवाशांच्या दिनचर्येवर परिणाम झाला आहे. महावितरच्या कार्यालयात जाऊन तक्रार केल्यास ट्रिपींगमुळे ही समस्या उद्‌भवत असल्याचे सांगितले जाते. ट्रिपींगमागील कारण मात्र अजून वीजकर्मचाऱ्यांना हुडकून काढता आले नाही. परिणामी ही समस्याही जैसे थेच आहे. 

अन्यथा नागरिकांच्या उद्रेकाचा सामना करा 

लॉकडाऊनमुळे मर्यादित कर्मचारीच कार्यरत होते. यामुळे नागरिकांनी भर उन्हाळ्यातही उकाडा सहन केला. लॉकडाऊनमध्ये शिथीलता आल्यानंतरही अडचणीतून मार्ग मात्र निघू शकला नाही. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र रोष आहे. विद्यार्थ्यांचेही ऑनलाईन वर्गही वीजेच्या लपंडावामुळे निट होत नाहीत. तातडीने प्रश्‍न मार्गी काढा अन्यथा वीजकर्मचाऱ्यांना नागरिकांच्या उद्रेकाचा सामना करावा लागेल, असा इशारा स्थानिक रहिवाशांनी दिला आहे. 
 
बिल घेताना, मग सेवाही द्या
 
लॉकडाऊननंतर अव्वाच्या सव्वा बिल पाठविण्यात आले. ग्राहकांनी ते वेळेत भरावेत यासाठी तगादा लावण्यात आला आहे. बिल नियमित घेता ना मग तेवढ्याच तत्परतेने सेवाही द्या, अशी मागणी येथील नागरिक नीलेश खाडे यांनी केली आहे. 

वसुली येवढीच तत्परता सेवेतही दाखवा
 
बिलाच्या वसुलीसाठी सतत तगादा लावला जातो. आता तर बिल भरण्यासाठी फोन करून ग्राहकांना भांबावून सोडले जात आहे. वसुलीसाठी करण्यात येणारी  घाई वीज ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या सेवेतही दाखवा, अशी येथील रहिवासी भावना प्रदीप अवचट यांनी व्यक्त केली आहे. 

कर्मचारी करतात तरी काय?
 
गेल्या 4 महिन्यांपासून साधी ट्रिपींगची समस्याही सोडविता येत नसेल तर कर्मचारी करतात तरी काय, असा सवाल नरेंद्र नगर येथील नागरिक विश्‍वनाथ धोटे यांनी उपिस्थत केला आहे.  

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Cup 2025: द. आफ्रिकेच्या मारिझान कापने झुलन गोस्वामीचा विश्वविक्रम मोडला! सेमीफायनलमध्ये ५ विकेट्स घेत घडवला इतिहास

एसटी बसमधून एमडी ड्रग्ज घेऊन येणारा मोहम्मद अझहर कुरेशी सोलापुरात जेरबंद! सापळा रचून बस स्थानकावर पकडले; पुरवठादारास व्हॉट्‌सॲप कॉलवरून करायचा संपर्क

Nilesh Ghaywal : गुंड घायवळ लंडनमध्ये; यूके हायकमिशनची माहिती, प्रत्यार्पणाच्या प्रक्रियेला गती

Kalyan Crime: दोन वर्षांच्या चिमुकलीवर कल्याण पोलिसांनी दाखल केला गुन्हा; खुनाचा प्रयत्न केल्याचा ठपका

Women's World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेने पहिल्यांदाच मिळवलं फायनलचं तिकीट! इंग्लंडचा सेमीफायनलमध्ये उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT