Chandrashekhar Bawankule Chandrashekhar Bawankule
नागपूर

अनिल देशमुखांसारखा भ्रष्टाचार यांना करता येणार नाही; म्हणूनच...

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बैलगाडी आणि सायकल मोर्चा काढला होता. केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील कर कमी करावे, अशी मागणी केली होती. त्याप्रमाणे केंद्र सरकारने त्यांची मागणी पूर्ण केली. आता राज्य सरकारने कर कमी करून जनतेला दिलासा देण्याची वेळ आली तर नाना पटोलेंसह महाविकास आघाडी सरकारचे नेते का मागे हटले, असा सवाल भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.

पेट्रोल, डिझेलवरील कर कमी करण्यावरून भारतीय जनता पक्ष आक्रमक झाला आहे. भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी शहरातील व्हेरायटी चौकात शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके आणि जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये यांच्या नेतृत्वात आंदोलन केले. सरकारने व्हॅट कमी केले तर दररोज ४०० ते ५०० कोटी रुपये राज्य सरकारचे नुकसान होणार आहे. त्यामुळे राज्य सरकार कर कमी करण्यास मागेपुढे पाहात आहे. परंतु, याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील, असा इशाराही बावनकुळे यांनी दिला.

रोजच्या ५०० कोटींवरील १० टक्के कमीशन म्हणजे ५० कोटी रुपये हे या लोकांना मिळणार नाहीत. म्हणून पेट्रोल, डिझेलवरील कर कमी करण्यात येत नाही आहे. अनिल देशमुखांसारखा भ्रष्टाचार या लोकांना करता येणार नाही. म्हणून हे सरकार जनतेचा खिसा कापत असल्याचा घणाघाती आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Governor Acharya Devvrat : ''पंतप्रधान नरेंद्र मोदी दैवी, त्यांच्यात अशक्यही शक्य करण्याची ताकद'', महाराष्ट्राचे राज्यपालांचे प्रशंसोद्‌गार....

AUS vs IND, ODI: रोहित शर्मा ठरला मालिकावीर! पुरस्कार जिंकल्यानंतर म्हणाला, 'आता युवा खेळाडूंना योग्य मेसेज...'

Customs Rule: सीमाशुल्क नियमांमध्ये मोठे बदल! महसूल विभागाची महत्त्वाची घोषणा, कधीपासून लागू होणार?

कपिल शर्माचा बॉलिवूडमध्ये कमबॅक ! 'या' सिनेमाच्या सिक्वेलमध्ये करणार काम

Uttar Pradesh : CM योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते होणार उत्तराखंड महोत्सवाचे उद्घाटन, महामंडळ सदस्यांनी घेतली भेट 

SCROLL FOR NEXT