Petrol at Rs 98 in Nagpur 
नागपूर

उपराजधानीत पेट्रोलचा स्कोर ९८*; केंद्राचा ३२.९८ तर राज्य सरकारचा २६.९० रुपये वाटा

राजेश रामपूरकर

नागपूर : फेब्रुवारीमध्ये इंधनदरात मोठी वाढ झाली. नागपुरात प्रतिलिटर पेट्रोल ९८.०६ रुपयांवर पोहोचले आहे. तर डिझेलला ८९.१३ रुपये लिटरमागे मोजावे लागत आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भाव २७.१२ रुपये प्रतिलिटर असताना देशात इंधनाचा भडका उडाला आहे. दररोजच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित बिघडले आहे. केंद्र आणि राज्य सरकारने लावलेल्या विविध करांमुळे देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढल्याचे चित्र आहे.

प्रतिलिटर पेट्रोलमागे केंद्र ३२.९८ रुपये कर आकारत आहे. राज्य सरकार २६.९० रुपये कर लावत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महसूल कमी झाल्याने कोणीही कर कमी करण्यास तयार नसल्याने ग्राहक मात्र यात भरडले जात असल्याचे चित्र आहे.

आयात केलेल्या कच्च्या तेलावर प्रक्रिया करून पेट्रोल-डिझेलची निर्मिती केली जाते. त्यानंतर प्रक्रियेचा, वाहतुकीचा तसेच पणन खर्च आणि नफा जवळपास ३.७५ रुपये प्रतिलिटर होतो. त्यानंतर केंद्र सरकारचे उत्पादन शुल्क लागू केले जाते. त्यामध्ये प्रतिलिटर मूलभूत उत्पादन शुल्क १.४, विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्क ११ रुपये आणि कृषी संरचना व विकास उपकर २.५ रुपये आणि अतिरिक्त उत्पादन शुल्क (रोज ऍण्ड इन्फ्रा सेस) १८ रुपये असे मिळून ३२.९८ रुपयांचे विविध कर आकारले जाते.

राज्य सरकारसुद्धा आपले कर लावते. त्यामध्ये २५ टक्के व्हॅट म्हणजेच १६.६० रुपये आणि १०.१२ रुपये अतिरिक्त कर लागतो. याशिवाय विक्रेत्याचे कमिशन ३.६५ रुपये आकारण्यात येते. त्यानंतर पेट्रोलचे दर ठरले जाते. डिझेलचे दरसुद्धा याचप्रमाणे ठरवण्यात येतात. 

लिटरमागे कराचे प्रमाण (रुपये) 

  • केंद्र - ३२.९८ 
  • राज्य - २६.९०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT