police arrest man in black market of railway ticket in nagpur 
नागपूर

नेट कॅफेतून रेल्वे तिकीटांचा काळाबाजार, आरपीएफकडून पर्दाफाश

योगेश बरवड

नागपूर : रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकाने कोराडी परिसरातील नेट कॅफेवर धाड टाकून रेल्वेच्या ई-तिकीटांचा काळाबाजार उघडकीस आणला. एका दलालाला अटक करीत त्याच्याकडून १५ हजार रुपये किमतीच्या १८ तिकीट हस्तगत करण्यात आल्या आहेत.

अशोक ढोमणे (२९) रा. विद्यानगर, असे अटकेतील दलालाचे नाव आहे. त्याचे महालक्ष्मी नेट कॅफे नावाचे प्रतिष्ठान आहे. येथूनच तो रेल्वे तिकीटांचा काळाबाजार करत होता. याबाबत मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे विभागीय सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडे यांच्या आदेशावरून कारवाईसाठी पथक तयार करण्यात आले. गुन्हे अन्वेषन विभागाचे निरीक्षक सुधीर कुमार मिश्र, निरीक्षक सी. एल. कनोजिया, उप निरीक्षक आर. के. यादव, हवालदार मनोज काकड, जवान आनंद करवाडे, अश्विन पवार, अमीत बारापात्रे यांनी धाडीची योजना आखली. ठरल्याप्रमाणे धाड टाकण्यात आली. 

चौकशीत त्याने सांगितले की, २-३ वर्षांपूर्वी सारथीचे आरक्षित ई-तिकीट मिळविण्याचे लायसेंस होते. सध्या तो अधिकृत एजेंट नाही. पण, त्याच्यावर शंका असल्याने खाक्या दाखविताच त्याने तिकीट काढून चढ्या दरात विक्री करीत असल्याची कबुली दिली. सोबतच आयआरसीटीसीच्या साईटवर त्याने १७ आयडी तयार केल्या असून त्यावरून तिकीट काढत असल्याचे मान्य केले. १८ तिकीटांचे प्रिंटआउटही काढून दिले. त्यातील ९ हजार २१५ रुपयांच्या ११ तिकीट पुढील तारखेच्या होत्या. त्याच्याकडून मोबाईल, प्रिंटर, संगणक असा एकूण ३९ हजार ४४९ रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. रेल्वे अधिनियमान्वये गुन्हा दाखल करीत त्याला अटक करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Islapur News : बँकेच्या कर्जाला कंटाळुन एका शेतकऱ्याने गळफास घेऊन संपविले जीवन

Vehicle Fitness Test: आरटीओची मोठी डिजिटल झेप! ६ मिनिटांत वाहनांची फिटनेस तपासणी करणार, नवीन प्रणाली कधी लागू करणार?

Pune BJP leads in campaign : पुण्यात भाजपचा प्रचाराचा धडाका!, महापालिका निवडणुकीसाठी जबरदस्त नियोजन

Ajit Pawar: धनंजय मुंडेंना पुन्हा संधी! राष्ट्रवादीची यादी जाहीर; नेत्यांची संपूर्ण लिस्ट पाहा

Viral Video : वजन झेपलं नाही अन् बंजी जंपिंगची दोरी तुटली..खोल दरीत पडून शरीराचे अवयव झाले वेगळे; धक्कादायक मृत्यूचा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT