police raid on gambling center inn gondia
police raid on gambling center inn gondia 
नागपूर

पोलिस दिसताच जुगाऱ्यांनी काढला पळ, एक लाख २८ हजारांचा ऐवज जप्त

मुनेश्‍वर कुकडे

गोंदिया : गस्तीवर असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नागरा येथील शिवमंदिरा मागे व डुग्गीपार येथील जुगार अड्ड्यावर छापा टाकला. यावेळी एक लाख २८ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला. काहींना ताब्यात घेतले, तर काहीजण पळून जाण्यात यशस्वी झाले.

नागरा येथील शिवमंदिर मागे मुन्ना तिरत हा काही लोकांना जमवून जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. त्यानुसार स्थानिक गन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला. जुगार खेळणारे राजेश कुंडल लिल्हारे, दीपक कैलास पाचे, किशोर विठ्ठलदास डोंगरे, कन्हैया रमेश बनकर, मुकेश दिलीप कुंडभरे, शेख कबीर शेख हबीब हे जुगार खेळताना आढळून आले तर, काही जण पोलिसांना पाहून पळून गेले. पळून जाणाऱ्यांत राजेश सोनवाने, शंकर लिल्हारे, लक्ष्मण छुरा, ओम मेश्राम आणि मुन्ना तिरत यांचा समावेश आहे. घटनास्थळी आरोपींच्या ताब्यातून रोख रक्कम 14,880 रुपये, सहा मोबाईल, एक दुचाकी, असा एकूण एक लाख दोन हजार 430 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

दरम्यान, 27 नोव्हेंबरला डुग्गीपार परिसरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकात डव्वा येथील पाणी टाकीजवळ काही जण जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली. तेथे छापा टाकून पोलिसांनी रामेश्वर बुधा कुरसुंगे, मुकेश शंकरलाल अग्रवाल, मुनेश्वर सोविंदा देवरे हे जुगार खेळताना मिळून आले. तसेच नवीन कैलास अग्रवाल, विनोद भैयालाल देवरे, राजू परिहार, जीवन बोहरे हे पोलिस पथकाला पाहताच पळून गेले. घटनास्थळी आरोपींच्या ताब्यातून 17 हजार 610 रुपये, जुगाराचे साहित्य आणि मोबाईल असा एकूण 26 हजार 235 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

ही कारवाई पोलिस अधीक्षक विश्व पानसरे, अपर पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या नियंत्रणात पोलिस कर्मचारी कवलजितपालसिंग भाटीया, अर्जुन कावळे, सोमेंद्र तुरकर, रेखलाल गौतम, तुलसीदास लुटे, रियाज शेख, चित्तरंजन कोडापे, इंद्रजित बिसेन यांनी केली. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EVM Hacked: EVM हॅक करायसाठी मागितले दीड कोटी रुपये; सापळा रचून दानवेंनी रंगेहाथ पकडलं

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates: भाजपविरोधातील पोस्ट तातडीनं हटवा; निवडणूक आयोगाचे 'X' ला आदेश

Lok Sabha Election 2024 : EVM ची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

Video: CSK ची प्रॅक्टिस पाहायला आलेला प्रेक्षक डॅरिल मिचेलच्या शॉटने जखमी, आयफोनही तुटला; त्यानंतर काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update : काँग्रेस सत्तेत आल्यास मोफत उपचार बंद होतील - पीएम मोदी

SCROLL FOR NEXT