police raid on red light area in Nagpur  
नागपूर

वेश्‍यावस्ती गंगाजमुनावर छापा; दलाल सचिन उचिया फरार; एसएसबीची कारवाई

अनिल कांबळे

नागपूर ः गंगाजमुनातील अल्पवयीन मुलींसह वारांगणांना ड्रग्सचा हायडोज देऊन त्यांच्याकडून बळजबरीने देहव्यापार करवून घेण्यात येत होता. त्यामुळे एसएसबीने गंगाजमुनात छापा घातला. या छाप्यात परप्रांतातील १४ वारांगणांना ताब्यात घेण्यात आले. 

गंगाजमुनातील कुख्यात दलाल सचिन उचियासह अन्य दलालांविरूद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला. गेल्या आठवड्यातच ‘सकाळ’ने गंगाजमुनातील अल्पवयीन मुलींकडून बळजबरीने देहव्यापार करण्यात येत असल्याबाबत वृत्त प्रकाशित केले होते, हे विशेष.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेच्या एसएसबी पथकाने बुधवारी दुपारी गंगाजमुनात छापा घातला. या छाप्यात परराज्यातील १४ वारांगणांना देहव्यापार करताना ताब्यात घेण्यात आले. त्यांचे मेडीकल केल्यानंतर करूणा सुधारगृहात रवानगी करण्यात आली. 

कश्‍मीरी गल्लीत जवळपास ५० पेक्षा जास्त अल्पवयीन मुलींकडून बळजबरी देहव्यापार करून घेत असल्याची चर्चा असलेला कुख्यात दलाल सचिन उचिया, बाबू निजू धनावत (रा. ढोलपूर, राजस्थान) आणि बिमलाबाई (कश्‍मीरी गल्ली) यांच्याविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. 

बाबू धनावत याला अटक करण्यात आली. तर सचिन उचीया आणि बिमलाबाई फरार झाल्या. दोघांचाही पोलिस शोध घेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून मनोज, इंगा, अमोल, ठाकूर, मोंटू, गजू, रोहित आणि मार्कंडे ही सर्व टोळी गंगाजमुनात वारांगणांना ड्रग्स पोहचवित असल्याची चर्चा आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik News : पंचवटीत महापौर दारी, तरीही समस्यांची वारी; अडीच वर्षांच्या सत्तेनंतरही नागरिक रडकुंडीला!

Almatti Dam : सरकारने ‘आलमट्टी’प्रश्‍नी भूमिका स्पष्ट करावी; आलमट्टी उंचीवाढविरोधी सर्वपक्षीय संघर्ष समितीची मागणी

IPL 2026 Marathi News: मुंबई इंडियन्सच्या 'वानखेडे'वरील सामन्यांच्या तिकिटांची खरेदी कुठून कराल? चाहत्यांसाठी मोठी घोषणा

Mumbai: समुद्राचं खारं पाणी गोडं करणारच, महायुती ठाम; शिवसेना,काँग्रेसचा मात्र विरोध

गुढीपाडव्याला पावसाचं संकट! विदर्भात गारपीटीचा तर मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्र अन् कोकणात अवकाळीचा इशारा

SCROLL FOR NEXT