This post about Corona on social media is causing increasing frustration  
नागपूर

सोशल मीडियावर कोरोनाबाबत या पोस्टमुळे वाढतेय नैराश्य, वाचा सविस्तर

राजेश प्रायकर

नागपूर : शहरात मोठ्या प्रमाणात कोरोनाबळी वाढत आहे. त्यामुळे भीती पसरली आहे. त्याचवेळी कोरोनातून बरे होणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. मात्र सोशल मीडियावर प्रशासनाचे प्रयत्न, बरे होणाऱ्या रुग्णांच्या सकारात्मक पोस्टऐवजी बळी, बाधितांची आकडेवारी जाहीर करणाऱ्या पोस्टचीच बजबजपुरी दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांत कोरोनाबाबत काळजीऐवजी भीती वाढत असल्याचे चित्र आहे. लॉकडाउन काळात संयम बाळगणाऱ्या नेटकऱ्यांनी पुन्हा कोरोनाबाबत सकारात्मक होण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

सोशल मीडियावर सध्या कोरोनाबाबत नकारात्मक घटनांचे व्हिडिओ, क्लिप्सची लाट आली आहे. त्याचे प्रतिकूल परिणामही समाजावर होत असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाबाबतची आकडेवारी दररोज आरोग्य विभागाकडून प्रसिद्ध केली जात आहे.

यात बाधित, बळींच्या आकड्यासोबतच उपचार घेत असलेले, उपचारातून बरे झालेल्या नागरिकांचीही आकडेवारी असते. याच आकडेवारीचा संदर्भ घेत फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्रामवर अनेकांच्या पोस्ट दिसत आहे. यात अनेकांकडून बळी, बाधितांच्या आकडेवारीचा ऊहापोह केला जात आहे. त्यामुळे नागरिकांत भीती वाढत असल्याचा निष्कर्ष सोशल मीडिया विश्लेषक अजित पारसे यांनी नोंदविला.

नेटकऱ्यांनी कोरोनातून मुक्त झालेले, यशस्वी उपचार घेत असलेल्या रुग्णांचीही माहिती पोस्ट केली तर नागरिकांत सकारात्मक वातावरण तयार होईल, असे पारसे यांनी सांगितले. सोशल मीडियाचा सकारात्मक वापर केल्यास कोरोनाबाबतची भीती नाहीशी होईलच, शिवाय नागरिकही यातून बरं होता येते या भावनेसह जीवनशैली अंगीकारतील.

मार्चपासून सुरू झालेल्या लॉकडाउन काळात घरात बसून सोशल मीडियायावरून अनेक सकारात्मक पोस्ट टाकून मानसिक बळ वाढवले. आता त्यापेक्षाही भयंकर स्थिती आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी भीती पसरविणाऱ्या पोस्ट न टाकता कोरोनाबाधितांचा आत्मविश्वास वाढेल, अशा पोस्ट टाकण्याची गरज आहे. प्रशासनाचे दोष दाखविणाऱ्या पोस्ट अधिक आहे. त्यामुळे सध्याच्या स्थितीत प्रशासनाबाबत विश्वास निर्माण करणारी माहिती सोशल मीडियातून पुढे येण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

 
सोशल मीडियाचा सकारात्मक वापर अवश्य आहे. कोरोनाच्या संकटकाळात नकारात्मक माहितीचा प्रसार करण्याऐवजी कोरोनामुक्त झालेले नागरिक, त्यांची आकडेवारी, त्यांचे यशस्वी प्रयत्न यावर नेटकऱ्यांनी भर दिला तर कोरोनाशी लढणाऱ्या बाधितांमध्ये मोठा आत्मविश्वास निर्माण होईल. नकारात्मक पोस्टमधून सामाजिक नैराश्य पसरवण्याचा धोका टाळण्याची जबाबदारी नेटकऱ्यांनी घ्यावी.
अजित पारसे, सोशल मीडिया विश्लेषक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test : रवींद्र जडेजाने 'तलवार' उपसली! कपिल देव यांचा विक्रम मोडला, Sobers सारख्या दिग्गजांसोबत जाऊन बसला

Latest Maharashtra News Updates : महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेकडून बाळासाहेब लांडगे यांचं निलंबन

बाबा वेंगाचं भाकीत खरं ठरणार? पुढच्या 6 महिन्यात 'या' 4 राशी करोडपती होणार? कोणत्या त्या राशी जाणून घ्या...

Pune Accident: बसची वाट बघत उभे होते, तेव्हाच टेम्पो काळ बनून आला अन्..., दोघांचा जागीच मृत्यू, घटनेने पुण्यात खळबळ

Dhule Crime : दारूच्या नशेत पत्नीवर प्राणघातक हल्ला, धुळे कोर्टाने सुनावली ५ वर्षांची शिक्षा

SCROLL FOR NEXT