नागपूर : जिल्ह्यात थंडीच्या दिवसांत ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा ज्वर वाढला आहे. गावातील नेते आपला गट कसा मजबूत होईल व आपल्या गटाचे उमेदवार निवडून येऊन सत्ता काबीज कशी करता येईल, याचे गणित जुळवीत गट तयार करण्याच्या कामात गुंतले आहेत. तसेच दुसरीकडे मतदार आपल्या गटाला निवडून देण्यासाठी मतदान करावे, याकडे लक्ष देत गाव खेड्यात मतदारांसाठी जेवणाच्या पंगतीला सुरुवात झाल्याचे चित्र गावखेड्यांत पहावयास मिळत आहे.
ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर होण्याच्या आदल्याच दिवशी नरखेड तालुक्यातील ७० ही ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचे आरक्षण काढण्यात आले होते. यात १५ जानेवारीला निवडणूक होणाऱ्या१७ ग्रामपंचायतींचा समावेश होता. यामुळे सरपंचपद ज्यासाठी आरक्षित आहे, त्या आरक्षित असलेले गाव राजकारणी मोठ्या जोमाने कामाला लागले होते. पण आता ग्रामविकास मंत्रालयाने ते रद्द करीत निवडणूक निकालानंतर आरक्षण सोडत काढण्याचा निर्णय घेतल्याने अनेकांचे स्वप्न भंगले आहे.
अधिक माहितीसाठी - Big Breaking : वाढदिवस साजरा करायला गेले, पण वाटतेच काळाने घातला घाला, कारच्या भीषण अपघातात ४ ठार, एक जखमी
नामांकन अर्ज दाखल करण्याचा अवधी अवघ्या सहा दिवसांवर असल्याने गावपुढारी व कार्यकर्त्यांमधील लगबग वाढली आहे. २३ डिसेंबरपासून नामांकनाला सुरुवात होणार आहे. विशेष म्हणजे आतापासून पॅनेल सेटिंगची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आपल्याला पॅनेलमध्ये स्थान मिळविण्यासाठी इच्छुकांनी देव पाण्यात घातले आहेत. आता नामांकन सुरू होण्यासाठी सात दिवस शिल्लक आहेत.
ग्रामपंचायतस्तरावर स्पर्धकांना टक्कर देण्यासाठी सक्षम पॅनेलच्या निर्मितीवर बहुतांश नेतेमंडळींचा जोर आहे. मागील वेळी केलेल्या चुका या वेळी करायच्या नाहीत, अशी खूणगाठ मनाशी बांधून नव्यांना संधी देण्याचे धोरण बहुतांश ठिकाणी राबविले जाणार असल्याची चर्चा ग्रामीण भागात आहे.
जात वैधता प्रमाणपत्र किंवा पावती द्यावी लागणार
एप्रिल ते डिसेंबरपर्यंत मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला. त्यानुसार आरक्षित जागांवर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांकडून जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणार असल्याचे हमीपत्र आणि जिल्हा जात पडताळणी समितीकडे जातवैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी सादर केलेल्या अर्जाची पोचपावती सादर करावी लागेल. यासंबंधीचे आदेश राज्य निवडणूक आयोगामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना ११ डिसेंबर रोजी पत्राद्वारे देण्यात आले आहेत.
ग्रामपंचायतींच्या रणांगणासाठी घोडदौड
सावनेर ः कोरोनामुळे गेल्या मार्च २०२० मध्ये होणाऱ्या पहिल्या टप्प्यामधील जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका राज्य निवडणूक आयोगाने स्थगित केलेल्या होत्या. त्यानंतर आता जिल्ह्यातील मुदत संपलेल्या १३० ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. यात सावनेर तालुक्यातील खुबाळा, नांदुरी, टेंभुर्डोह, गडमी, खुर्सापार, जटामखोरा, सावंगी- हेटी, पाटणसावंगी, पोटा, नरसाळा, सोनपूर, जैतपूर आदीं १२ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या गावातील निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एकमेकांमध्ये स्पर्धा, गटबाजी, आरोप-प्रत्यारोप आतापासूनच सुरू आहेत निवडणुकीत आपल्या समर्थकांना निवडून आणण्यासाठी राजकीय पक्षही सक्रिय आहे. असे जरी असले तरी ग्रामीण भागात विद्यमान मंत्री सुनील केदार यांचा दबदबा असल्याने बहुतांश ग्रामपंचायतीवर केदार गटांचा ताबा दिसून येत आहे. त्यामुळे त्यांच्या समर्थकांवर मात करून इतर पक्षांना आपल्या समर्थकांची वर्णी लावणे कठीण आहे. या बारा ग्रामपंचायतींवर आपला ताबा असावा यासाठी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष मनोहर कुंभारे जनसंपर्क वाढवीत आहेत, तर दुसरीकडे भाजपचे पदाधिकारीही कामाला लागले आहेत.
संपादन : अतुल मांगे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.