Prisoner ran away from medical still not caught by Nagpur police
Prisoner ran away from medical still not caught by Nagpur police  
नागपूर

तब्बल १२ दिवस उलटूनही मेडिकलमधून पळालेला कैदी फरारच; नागपूरचे स्मार्ट पोलिस ठरताहेत अपयशी

अनिल कांबळे

नागपूर ः मेडिकल हॉस्पीटलच्या ट्रामा केयरमध्ये बनलेल्या कोवीड सेंटरमधून पळून गेलेला कुख्यात कैदी नरेश अनकालू महिलांगे (२५, पुंजारामवाडी, गल्ली क्र. १०, कळमना) अद्याप सापडलाच नाही. या घटनेला आतापर्यंत १२ दिवसांचा कालावधी लोटला गेला असून अजुनही पोलिसा त्याचा शोध घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या ७ नोव्हेंबरला हुडकेश्‍वर ठाण्याच्या डीबी पथकाने मध्यवर्ती कारागृहातून नरेश महिलांगे याला प्रॉडक्शन वारंटवर ताब्यात घेतले होते. नरेशला कोरोनाची लागन झाली होती. त्यामुळे त्याला मेडिकलमध्ये कोवीड सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते. त्याच्यावर नजर ठेवण्यासाठी गार्ड ड्युटीवर पोलिस हवालदार अरूण पाटील आणि कर्मचारी राजेंद्र लेंडे यांना तैनात करण्यात आले होते. 

कैदी नरेश याने मेडिकलमधून पळून जाण्याचा प्लान तयार केला. शौचास गेल्यानंतर खिडकीतून पाईपच्या मदतीने तो खाली उतरला आणि फरार झाला. तो फरार होताच एकच खळबळ उडाली. पोलिस हवालदार पाटील आणि लेंडे यांनी त्याच शोध घेतला. वरिष्ठ अधिकारी आणि अजनी पोलिसांना माहिती दिली. कैदी नरेशचा शोध घेण्यासाठी पोलिसांची चार पथके तैनात करण्यात आली आहेत. चारही पथके फरार कैद्याचा शोध घेत आहेत.

कैदी ठरू शकतो कोरोना वाहक

कैदी नरेश महिलांगे हा कोरोना बाधित आहे. उपचार सुरू असतानाच तो पोलिसांना गुंगारा देऊन पळून गेला. सध्या कोरोनाची दुसरी लाट पसरण्याच्या स्थितीत आहे. अशातच हा कैदी कोरोनाचा वाहक ठरू शकतो. पोलिसांच्या एका चुकीमुळे शेकडो लोकांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या कैद्याला अटक करणे पोलिसांंसमोर मोठे आवाहन आहे.

स्मार्ट पोलिस अपयशी

नागपूर पोलिसांची ख्याती राज्यभर आहे.तसेच नागपूर क्राईम ब्रॅंचची तुलना मुंबई क्राईम ब्रॅंचशी केल्या जाते. मात्र गेल्या १२ दिवसांपासून पोलिसांना मामा बनवून फरार झालेल्या कैद्याचा कोणताही धागादोरा पोलिसांना मिळाला नाही. त्यामुळे स्मार्ट नागपूर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

मेडिकलमधून फरार झालेल्या कैद्याचा आम्ही कसोशीने शोध घेत आहोत. कैद्याबाबत काही माहिती आमच्या हाती लागली आहे. त्यावर काम सुरू आहे. लवकरच फरार आरोपीला अटक करण्यात येईल.
- डॉ. अक्षय शिंदे 
(पोलिस उपायुक्त, झोन-४) 

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

IPL 2024 MI vs SRH Live Score: पीयूष चावलाच्या फिरकीची जादू चालली, हेडपाठोपाठ क्लासेनलाही केलं क्लिन-बोल्ड; हैदराबादचा निम्मा संघ गारद

Hires Women to Seduce Men: पबमध्ये पुरुषांना भुरळ घालण्यासाठी महिलांची नियुक्ती; पोलिसांच्या छाप्यात धक्कादायक प्रकार उघड

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

SCROLL FOR NEXT