नागपूर : गरिबीमुळे अनेकदा नातेवाइकांकडून मुलींना वेश्याव्यवसायात (Ganga Jamuna) ढकलणाऱ्या मुलीची सुटका करीत संसार थाटून देत त्यांच्या जीवनात नवा प्रकाश फुलविण्याचे काम शहर पोलिसांनी केले आहे. शहराच्या रेड-लाइट परिसरातून सुटका केलेल्या मुलीची तिच्या प्रियकरासोबत पोलिसांनी लग्न लावून दिले. शहर पोलिसांनी केवळ सुरक्षाच पुरवली नाही तर कार्यक्रम व्यवस्थापक, पाहुणे, वरातींची भूमिका पार पाडली.
गंगाजमुना परिसरात छापे टाकून या व्यवसायात असलेल्या मुलींना बाहेर काढण्यासाठी पोलिसांकडून मोठी मोहीम राबविण्यात आली. त्यातूनच या वस्तीतून वेश्याव्यवसाय कायमचा हटविण्यात आला. मात्र, ज्या मुलींचा त्यात समावेश होता त्यांचे पुनर्वसन करण्याची जबाबदारी समाजाची असल्याने काही सामाजिक संघटनांच्या मदतीने पोलिसांनी पुढाकार घेत मुलींचा संसार थाटण्याचे सुरू (Marriage) केले.
अशाच एका प्रकरणात अल्पवयीन मुलीची गंगाजमुना (Ganga Jamuna) परिसरातून सुटका मागच्या वर्षी करण्यात आली होती. कायदेशीर बाबी पार पाडून तिला इतर मुलींप्रमाणे वसतिगृहात ठेवण्यात आले. काही महिन्यांपूर्वी ती सज्ञान झाली. त्यामुळे तिच्या मर्जीनुसार वागण्याचे स्वतंत्र प्राप्त झाले. तिच्या मर्जीनुसार मुलाचा शोध घेत व सामाजिक संस्थांची मदत घेत तिचा विवाह करून दिला. ती आता समाजाच्या मुख्य प्रवाहात असल्याचे समाधान पोलिसांनी व्यक्त केले.
अमितेश कुमार यांनी दिला आशीर्वाद
विवाहानंतर (Marriage) हे जोडपे थेट शहर पोलिस (Police) प्रमुख अमितेश कुमार यांच्या कार्यालयात ‘आशीर्वाद’ घेण्यासाठी गेले. पोलिसांनी त्यांची ओळख लपवून ठेवली आहे. कारण, ती उघड झाल्यास त्यांच्या जिवाला धोका होऊ शकतो. वेश्याव्यवसाय करीत असताना ती मुलगी २३ वर्षांच्या तरुणाच्या प्रेमात पडली होती. जो तिच्याकडे वारंवार येत होता.
मुलीने व्यक्त केली होती लग्नाची इच्छा
वयाच्या नऊव्या वर्षी गंगाजमुनात विकल्यानंतर अनेक वर्षे ही मुलगी कुंटणखान्यात बोगद्यामध्ये राहिली. आयटीआय उत्तीर्ण असलेला तरुण कुंटणखान्यात जाताना मुलीला भेटला होता. गेल्यावर्षी लकडगंज पोलिसांनी सुटका केलेल्या चार मुलींमध्ये या अल्पवयीन मुलीचा समावेश होता. तिला पोलिसांनी सरकारी निवारागृहात ठेवले होते. पोलिसांना तिचे पुनर्वसन केले. तेव्हा तिने लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती, हे विशेष...
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.