file photo 
नागपूर

रानडुकराने केला हल्ला, युवती पळाली, विहिरीत पडली, अन्‌... 

सकाळ वृत्तसेवा

रामटेक (जि.नागपूर):  आजी-आजोबांसोबत शेतातील धान उचलत असताना रानडुकरांनी युवतीवर अचानक हल्ला केला. जीव वाचविण्यासाठी सैरावैरा पळत असताना रानडुकराने धडक दिल्याने 20 वर्षीय तरुणी विहिरीत पडली. त्यातच तिचा मृत्यू झाला. दिव्या सिद्धार्थ सांगोडे (रा. चारगाव) असे मृत युवतीचे नाव आहे. 

जीव गमावला 
तालुक्‍यातील चारगाव ग्रामपंचायत खैरी बिजेवाडाअंतर्गत येते. मुख्य धंदा शेती असलेल्या गावातील गुलशन सिद्धार्थ सांगोडे याने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत रानडुकरांनी हल्ला केल्याने त्याच्या 20 वर्षीय बहिणीचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याने वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली. 

वनविभागाकडून बंदोबस्त नाही 
जंगलातील रानडुकरे दररोजच शेतकरी, शेतमजूर यांच्यावर हल्ला करतात. शेतात काम करताना जीव मुठीत घेऊनच काम करावे लागते. हे रानडुकरांचे कळप शेतातील उभी पिके फस्त करून टाकतात. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान तर करतातच, ते शेतात काम करणाऱ्यांवरही जीवघेणा हल्ला करतात. आतापर्यंत अशा अनेक घटना घडलेल्या आहेत. रानडुकरांचा बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांकडून अनेकदा मागणी होते. मात्र वनविभागाकडून काही बंदोबस्त होत नाही आणि नुकसानभरपाईदेखील मिळत नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG Semi: भारत-इंग्लंड सामना काही कारणास्तव झालाच नाही, तर काय होईल? फायनलला कोण जाईल? राखीव दिवसाचा नियम

Pet Friendly Rangapanchami 2026: यंदाची रंगपंचमी फक्त आपल्यासाठीच नाही, तर 'त्यांच्या'साठीही खास करा; अशी साजरी करा पेट-फ्रेंडली रंगपंचमी

Latest Marathi News Live Update : जालन्याचे खासदार कल्याण काळे हे दुबईमध्ये अडकले, ते सुरक्षित ठिकाणी असल्याची माहिती

Mumbai Traffic: मुंबईकरांचा प्रवास होणार सुसाट! वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पालिकेचा ६ हजार कोटींचा 'मास्टर प्लॅन'

Nashik Crime : सातपूर हादरले! विवाहितेची दोन लाखांत विक्री करून लावला बळजबरीने विवाह

SCROLL FOR NEXT