mangesh kadav 
नागपूर

खंडणीबाजाची अखेर पक्षाने केली हकालपट्टी! अनेक खंडणीबहाद्दर रडारवर

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : पक्षातील पदाच्या जोरावर गरीब सामान्य जनतेची पिळवणुक करणाऱ्या एका नेत्याचा भंडाफोड झाला आहे. पक्षाचा धाक दाखवून तो अनेकांकडून खंडणी वसूल कररायचा. शिवसेनेचा खंडणीबाज शहरप्रमुख मंगेश कडव याची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्याच्यावर खंडणी, फसवणूक, घर बकळकावणे यासारखे अनेक गुन्हे दाखल असून या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे. गुन्हे दाखल झाल्यापासून कडव फरार आहे.

पट्टे आणि गॉगल विकणारा कडव शिवसेनेत दाखल झाल्यानंतर लक्षाधीश झाला. मुंबईपासून तर गडचिरोलीपर्यंत त्याने अनेकांना फसविले आहे. पक्षातील पदाचा वापर तो खंडणीसाठी करायचा. लोकांना शिवसेनेचा धाक दाखवायचा. राजकीय वरदहस्त आणि भीतीमुळे त्याचे आजवर चांगलेच फावले होते.

महाआघाडीचे सरकार येताच त्याने आता आपले कोणी काही बिघडवू शकत नाही अशा थाटात फसवणुकीचे काम सुरू केले होते. शिवसेनेच्या गडचिरोलीतील एका पदाधिकाऱ्याने त्याची विधानसभेची उमेदवारी आणि जिल्हा प्रमुखपदासाठी 25 लाखांची लाच मागितल्याची तक्रार केली होती. तेव्हापासून कडवचे फासे उलटे पडले. याप्रकरणाची तक्रार मागे घेतल्यानंतर दोनच दिवसात त्याच्या विरोधात दुसऱ्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर भीतीने बोलायला तयार नसलेलेही अनेकजण पुढे आले.

मुंबईतील रंगशारदा हॉटेल गृपच्या मालकाचीही कडवने फसवणूक केली. मुंबईतील बड्या नेत्यांकडे तक्रार केल्यानंतरही कोणी कारवाई केली नव्हती. त्यामुळे मंगेशची हिंमत चांगलीत वाढली होती. नागपूरमध्ये अनेक खंडणीबहाद्दर शिवसैनिक पक्षाला बदनाम करीत आहेत. यापूर्वी वाळुचोरी प्रकरणी चिंटू महाराज यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय अनेक खंडणीखोर पक्षाच्या रडावर असल्याचे कळते.
जाधव यांनाही हटवले
कडवच्या घोटाळ्याचा फटका शिवसेनेचे जिल्हा प्रमुख माजी खासदार प्रकाश जाधव यांनाही बसला आहे. जाधव यांच्या जिल्हाप्रमुख पदाला स्थगिती देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT