नागपूर: कोरोनाच्या वाढता प्रादुर्भाव व मागणीपेक्षा आवक कमी असल्याने गणपती पाठोपाठ ज्येष्ठागौरी (महालक्ष्मी) आवाहन आणि पूजेसाठी फुलांची मागणी वाढली आहे. आठ दिवसापासून हाराची मागणी फूल विक्रेत्यांकडे नोंदविली जाते. मागीलवर्षी पेक्षा आवक ५० टक्कयांनी कमी असल्याने यंदा फुलांच्या दरात विक्रमी भाव वाढ झालेली आहे. त्यामुळे महालक्ष्मी पूजेच्या हाराच्या जोडीचे दर १२०० ते ५००० रुपयापर्यंत पोहचली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा हारांच्या नोंदणीला अल्प प्रतिसाद आहे.
महालक्ष्मीमच्या काळात हाराचा व्यवसाय २५ ते २७ लाखावर जातो. शहरातील सर्वच प्रमुख विक्रेत्याकडे हारासाठी बुकिंग जोमात होते . यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे त्यात घट झालेली आहे. उद्या मंगळवारी (ता. २५) ज्येष्ठगौरीचे आवाहन असून , बुधवारी पूजा होणार आहे. या पूजेसाठीच खास हार तयार केले जातात. या पुजेसाठी भाविक कोणतीही कसर ठेवत नाही. त्यामुळेच हारांचे ' बुकिंग जोमाने होत होते. यदा मात्र, कोरोनाच्या इम्पॅक्ट इतर व्यवसायाप्रमाणेच या व्यवसायाला बसू लागला आहे असे अरोमा फ्लावर्सचे संचालक जयंत रणनवरे यांनी सांगितले.
महालक्ष्मीसाठी शेवतीच्या फुलाच्या हाराला सर्वाधिक मागणी असते. त्याची किंमत १२०० ते १५०० या दरम्यान दरवर्षी असते. यंदा फुलांची आवक कमी अल्याने त्यात वाढ झाली असून हारांच्या किंमती १५००ते १८०० रुपयापर्यंत जाण्याची शक्यता आहे. आहे . यदा पावसामुळे आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी शेवतीचे उत्पादन कमी झाले आहे, असेही रणनवरे म्हणाले.
निशिगंधाच्या फुलाच्या हाराचा दर १८०० ते २५०० पर्यंत जाण्याची शक्यता आहे. लिलीच्या हारासाठी तीन ते साडे तीन हजार रुपये मोजण्याची तयारी असते . गुलाबाच्या पाकळ्यांच्या फुलांच्या दराने यंदा विक्रम केला आहे . हाराच्या जोडीचा दर पाच हजार रुपयांवर पोहोचला आहे . तरीही मागणी वाढली आहे, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.
शहरात बडी इतवारी , सदर , धरमपेठ , महाल , सक्करदरा , देवनगर , छोटा ताजबाग परिसरातील दुकानदाराची लगबग सुरू आहे . यदा मात्र , हाराची बुकिंगच नसल्याने व्यवसाय प्रभावित झालेला आहे. मागणीपेक्षा फुलांची आवक कमी असल्याने भाव गगनाला भिडले आहे. शहरात सध्या बंगळूरू, नाशिक , हैदराबाद येथून फुलांची आवक सुरू आहे. पूजेच्या फुल्लाची आवक स्थानिक शेतकऱ्यांकडून होत असली तरी ती अतिशय अल्प असल्याने भाव वाढ झालेली आहे.
संपादन - अथर्व महांकाळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.