refused to check sample of Sputum of corona patients in gmc tb ward nagpur 
नागपूर

धक्कादायक! नातेवाइकांनाच घ्यायला लावले कोरोनाबाधितांच्या थुंकीचे नमुने, तपासणी करायलाही दिला नकार

केवल जीवनतारे

नागपूर : कोरोना काळात कोरोनाबाधितांनाही क्षयाची लागण होण्याची दाट शक्यता आहे. यामुळेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडिकल )च्या ट्रॉमा अर्थात कोविड हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांमध्ये क्षयाची लक्षणे आढळून आले. त्यामुळे त्यांच्या थुंकीचे नमुने तपासण्यासाठी मेडिकलमधील टीबी विभागातील प्रयोगशाळेत नातेवाईक घेऊन गेले. परंतु, येथील कर्मचाऱ्यांनी हे नमुने तपासण्यास नकार दिला असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. 

मेडिकलमधील कोविड हॉस्पिटलमध्ये (ट्रॉमा युनिट) खुशाल मेश्राम आणि गोदरु वाघमारे या दोघांना क्षय असल्याचा प्राथमिक अंदाज उपचारादरम्यान व्यक्त करण्यात आला आहे. यामुळे या रुग्णांच्या थुंकीचे नमुने तपासण्याचा सल्ला येथील डॉक्टरांनी दिला. दरम्यान, येथील परिचारिका किंवा डॉक्टर यांनी नमुने न घेता कोरोनाबाधित रुग्णांच्या थुंकीचे नमुने नातेवाइकांनी घ्यावे, असे सांगण्यात आले. जवळचे नातेवाईक असल्याने त्यांनी जीव मुठीत घेऊन नमुने घेतले. टीबी वॉर्ड परिसरातील वॉर्डात नेले. मात्र, येथे हे नमुने स्वीकारण्यात आले नाही. कोरोनाबाधितांचे नमुने तपासण्याचे धोरण अद्याप तयार झाले नसल्याचे या नातेवाईकांना सांगण्यात आले. 

धोरण ठरायचे आहे तर मग नातेवाइकांना नमुने घेण्यास का लावले? असा सवाल वंचितचे कार्यकर्ते सिद्धांत पाटील यांनी केला आहे. संतप्त झालेल्या नातेवाइकांनी रुग्णाच्या जिवाला बरे वाईट झाल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. यासंदर्भात क्षयरोग विभागप्रमुखांशी संपर्क साधला असता, संपर्क होऊ शकला नाही. 

कर्मचाऱ्यांवर नाही वचक - 
कोरोनाबाधितांच्या थुंकीचे नमुने हातात घेऊन नातेवाईक तासभर टीबी वॉर्ड परिसरात तासभर प्रतीक्षा करीत होते. परंतु, येथील कर्मचाऱ्यांनी नमुने स्वीकारले नाही. विशेष असे की, या विभागातील वरिष्ठ डॉक्टरांना याची माहिती दिल्यानंतर त्या कर्मचाऱ्यांशीच बोला, माझ्याशी संबंध नाही, असे सांगण्यात येते. यामुळे या कर्मचाऱ्यांवर कोणताही वचक नसल्यानेच रुग्णांच्या नातेवाइकांची अशाप्रकारची हेळसांड होत असते. या प्रकरणाची तक्रार करण्यात येईल, असेही पाटील म्हणाले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा M. Chinnaswamy Stadium वरील हा शेवटचा सामना कसा? नेमकी भानगड काय? Explained

IPL 2026 Point Table: विराट कोहलीचे शतक हुकले, देवदत्त पडिक्कलने चागंलेच झोडले; RCB चा घरच्या मैदानावरील शेवटच्या लढतीत विजय

Paytm Bank: पेटीएम पेमेंट्स बँकेचा परवाना रद्द! वापरकर्त्यांवर काय परिणाम होणार? पेमेंट करता येणार का? जाणून घ्या...

Manohar Mama Arrested: आणखी एका बाबाला अटक! स्वतःला बाळूमामाचा अवतार सांगायचा; कुर्डुवाडीत गुन्हा दाखल

RCB vs GT Live: विराट कोहलीने इतिहास रचला! IPL मध्ये असा पराक्रम करणारा पहिलाच फलंदाज ठरला; गेल, रोहितच्या यादीत स्थान

SCROLL FOR NEXT