Relatives with children not come to the funeral 
नागपूर

कठोर मुलीला बाप नको होता; पण, चार लाख मिळविण्यासाठी हवे मृत्यूप्रमाणपत्र

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : स्वतःच्या वडिलांच्या अंत्यदर्शनासाठीसुद्धा येण्यास मुलीने नकार दिला. वारंवार विनवणी करून तिला पाझर फुटला नाही. शेवटी परक्यांनीच अंत्यसंस्कार आटोपले. मात्र, वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या बँक खात्यात निवृत्तिवेतनाचे चार लाख असल्याचे कळताच मुलीने ते मिळविण्यासाठी मृत्यूपत्र मिळावे म्हणून मुंबईतून सावनेरला येण्याची दर्शविली. वाचा काय आहे संपूर्ण प्रकार...

अपत्यांसाठी प्रत्येक मायबाप आयुष्यभर कष्ट उपसतात. स्वत: एक वेळ उपाशी राहून मुलांना तळहातावरील फोडाप्रमाणे जपतात. स्वत:च्या वाट्याला आलेल्या गरिबीची झळ आपल्या लाडक्यांना बसू देत नाही. मात्र, वृद्धापकाळी त्याच मायबापांच्या वाट्याला वेदना आणि यातना याशिवाय काहीच येत नाही. विशेष म्हणजे, त्यांना वेदना देणारे दुसरे, तिसरे कुणी नसून त्यांची स्वत:ची अपत्ये असतात.

काही मुले-मुली तर इतकी निर्लज्ज असतात की स्वत:च्या आई-वडिलांच्या अंत्यसंस्काराला येण्याची त्यांना लाज वाटते. असा काहिसा प्रकार कोल्हापूर येथील शिशुपाल पटवणे या वृद्धाच्या नशिबी आला. त्यांना स्वत:ची मुले-मुली असतानाही कुणीही त्यांच्या अंत्यसंस्काराला आले नाही. शेवटी सावनेर तालुक्यातील हितज्योजी आधार फाउंडेशनने माणुसकी जपत पटवणे यांच्यावर अंत्यसंस्कार केले.

आकाश उजळले होते
इतकेच मला जातांना सरणावर कळले होते
मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते
घर माझे शोधाया मी वाड्यावर वणवण केली
जे दार खुले दिसले ते आधीच निखळले होते...

असाच प्रकार शिशुपाल पटवणे यांच्याबाबतही घडला.

पटवणे हे कोल्हापूर येथील महानगरपालिकेत सफाई कर्मचारी होते. १२ जून रोजी हितज्योती फाउंडेशनने त्यांचा एक व्हिडिओ केला होता. त्यानंतर पटवणे यांच्या मुली आणि मुलांचासुद्धा पत्ता लागला होता. स्वत:च्या वडिलांविषयी त्यांना माहिती होऊनही ते लोक त्यांना घेण्यासाठी काही आले नाही. नंतर त्यांना आश्रममध्ये दाखल करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. मात्र, कोरोना असल्याने कोणतेही आश्रम त्यांना ठेवण्यासाठी तयार नव्हते. त्यानंतर त्यांचा जीवनप्रवास रस्त्यावरच सुरू झाला.

मुलीही कठोर असू शकतात हे तेव्ह कळले

रस्त्यावर जीवन जगत असतानाच १० ऑक्टोबरला त्यांना एका अज्ञात वाहनाने धडक दिली. हितज्योतीनेच त्यांना मेडिकल रुग्णालयात दाखल केले. फाउंडेशनचे पदाधिकारी रात्रभर रुग्णालयातच थांबले होते. सकाळी पुन्हा पटवणे यांच्या मुलीशी संवाद साधला. मात्र, काहीही उपयोग झाला नाही. स्वत:च्या वडिलांना घरी घेऊन जाण्यास तिने स्पष्ट नकार दिला. पटवणे यांची मृत्यूशी झुंज सुरू होती. तरीही मुलीला पाझर फुटला नाही. मुलीही इतक्या कठोर असू शकतात, हे तेव्ह कळले. अखेर त्यांचा मृत्यू झाला.

पदाधिकाऱ्यांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली

त्यांच्यावर हितज्योती फाउंडेशननेच अंत्यसंस्कार केले. अंत्यदर्शनासाठीही मुलगी आली नाही. पटवलेंना अखेरचा श्वास घेताना झालेला त्रास आणि मृत्यूनंतर झालेली हेळसांड बघून हितज्योतीच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rekha Gupta Announcement: 'जनसुनावणी'वेळी झालेल्या हल्ल्यानंतर आता दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची मोठी घोषणा, म्हणाल्या...

Ajinkya Rahane नंतर कोण होणार मुंबईचा कर्णधार? श्रेयससोबत शर्यतीत ३३ वर्षीय खेळाडू; MCA कडे आहेत 'हे' तीन पर्याय

Ganpati Festival Toll Free: गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित! कोकण प्रवास भाविकांना टोल फ्री, पास मिळवण्याची प्रक्रिया काय? जाणून घ्या

Vijay Thalapathy News: विजय थलपतींनी २०२६च्या तामिळनाडू निवडणुकीबाबत केली मोठी घोषणा!

Maharashtra Latest News Update: तमिळनाडूत एनआयएचे छापे, रामलिंगम हत्याप्रकरणातील संशयिताला अटक

SCROLL FOR NEXT