remdesivir not available in nagpur corona update 
नागपूर

कोणी रेमडिसिव्हिर देता का? नातेवाईकांची भटकंती, तर बाधित डॉक्टरांचेही हाल

केवल जीवनतारे

नागपूर : कोरोनाचा संसर्ग पुन्हा झपाट्याने वाढल्याने रेमडिसिव्हिर औषधाची मागणी वाढली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी काळाबाजार होत आहे. औषधाच्या दुकानातून रेमडिसिव्हिर औषध खरेदीवर निर्बंध घातले गेले. या निर्बंधामुळे नवीन पेच निर्माण झाला. एकीकडे ४१ हजार ७५० रेमडिसिव्हिर उपलब्ध असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. परिणामी नातेवाइकांना औषधासाठी भटकंती करावी लागत आहे. 

रेमडिसिव्हिर उपलब्ध होत नसल्याने ज्यांना गरज आहे, अशा श्रीमंत कोरोनाबाधितांनीही मेडिकलमध्ये आम्हाला दाखल करून घ्यावे अशी विनंती करणारे फोन डॉक्टरांना मोबाईलवर येत आहेत, तर दुसरीकडे छुप्या पद्धतीने विक्री होत असून यामुळे काळाबाजाराला ऊत येण्याची शक्यता आहे. खासगी रुग्णालयांनी बाधितांच्या हाती चिठ्ठ्या देत रेमडिसिव्हिर आणून द्या, अन्यथा रुग्णांना धोका झाल्यास जबाबदारी आमची नाही, अशीही भूमिका घेत असल्याचे नातेवाईक सांगत आहेत. 

बाधित डॉक्टरांचे मेडिकलमध्ये फोन - 
रेमडिसिव्हिर औषधं उपलब्ध होत नसल्यामुळे मोठा घोळ निर्माण झाला आहे. शहरात अनेक डॉक्टरही कोरोनाबाधित आहेत. त्यांना देखील मेडिकल स्टोअरमधून रेमडिसिव्हिर उपलब्ध होत नसल्यामुळे त्यांना मनस्तःप होत आहे. त्यांनी मेडिकलच्या अधिकाऱ्यांना फोन करून आम्हालाही मेडिकलमध्ये दाखल करा, आम्हाला रेमडिसिव्हिर उपलब्ध करून द्या, अशी विनंती वजा करणारे डॉक्टरांचे फोन येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : रघुनाथ येमूल यांची उच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता; ‘नाना गायकवाड’ प्रकरणातील सर्व आरोप रद्द

DC vs KKR Live: लोकेश राहुलची ऐतिहासिक कामगिरी! IPL मध्ये असा पराक्रम केला, जो आतापर्यंत एकालाही नव्हता जमला...

Thalapathy Vijay Government : तमिळनाडूत 'थलपती'चा ऐतिहासिक 'विजय'! बहुमताचा गाठला जादूई आकडा, उद्या घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ; 'द्रविडी' राजकारणात नवा अध्याय

खळबळजनक : वर्ल्ड कप विजेत्या क्रिकेटपटूच्या घरी सापडला एअरलाइन्सच्या SEO चा मृतदेह, क्रीडाविश्व हादरलं; आत्महत्या की हत्या?

Ashtavinayak Temples : गणेश भक्तांसाठी महत्त्वाची बातमी! मोरगाव, थेऊर आणि सिद्धटेक येथील अष्टविनायक मंदिरे महिनाभर राहणार बंद

SCROLL FOR NEXT