Residential schoolस in nagpur are closed from last 8 years 
नागपूर

नागपुरातील निवासी शाळा केंव्हा सुरू होणार? गेल्या ८ वर्षांपासून मुलं आहेत शिक्षणापासून वंचित 

केवल जीवनतारे

नागपूर : सफाई कामगारांच्या मुलांसाठी राज्यात पुणे आणि नागपूर येथे सामाजिक न्याय विभागाच्या अधिकारातील अवघ्या दोन निवासी शाळा आहेत. मात्र नागपुरातील शाळा मागील आठ वर्षांपासून बंद पडली आहे. यामुळे या मुलांच्या शैक्षणिक प्रगती व गुणवत्ता वाढीत अडचण येत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. 

दुर्गंधी येणारे अन्नपदार्थ, सॅनिटरी नॅपकिन्स, मेलेली कुत्री, मांजरे आणि घुशी, विष्ठा, हॉस्पिटलातला घातक कचरा अशी सारी घाण स्वच्छ करण्यासाठी सफाई कामगार आहेत. घाणीत हात घालण्याची त्यांचीही इच्छा नसते. परंतु, त्यांचा नाइलाज आहे. कुटुंबाचं पोट भरण्यासाठी त्यांना या नरकयातना भोगाव्या लागतात. यामुळेच या सफाई कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी असलेल्या योजनांची योग्यरीत्या अंमलबजावणी व्हावी, सफाई कामगारांची मुले शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून त्यांच्या शिक्षणाची सोय व्हावी या हेतूने नागपूर व पुणे येथे निवासी शाळा उभारण्यात आल्या. 

मात्र नागपुरातील झिंगाबाई टाकळी येथील शाळा बंद पडली आहे. सफाई कामगारांच्या मुलांची शैक्षणिक प्रगती यामुळे खुंटत आहे. नागपूर जिल्ह्यात सुमारे दीड लाखापेक्षा अधिक संख्येने हा समाज आहे. या समाजात भंगी, मेहतर, ओलगाना, रुखी, मलकाना, हलालखोर, लालबेगी, बाल्मिकी, करोर, झाडगल्ली, हेला अशा जातींचा समावेश आहे. 

९० ते ९५ टक्के लोक दहावी नापास असल्याचे दिसून येते. केवळ ३०० ते ४०० जण काही उच्च शिक्षित असतील, जे आपल्या पाल्यांना खासगी शाळेत शिकवतात. नागपूर जिल्ह्यात प्रामुख्याने ठक्कर ग्राम पांचपावली, बोरकर नगर जाटतरोड़ी, लालगंज, शांती नगर, दाना गंज,लकड गंज, बगडगंज,गंगाबाई घाट,बेज़नबाग,गड्डीगोदम,नाइ बस्ती,भालदार पूरा, यादव नगर, वैशाली नगर, फुकट नगर ईटा भट्टी, टिमकी तीन खम्बा, खलासी लाइन,गंजीपेठ, बाल्मीकि नगर गोकुलपेठ,महालगी नगर, पंधरबोडी,काफला जाट तरोड़ी,टी बी वार्ड ,अजनी रेलवे कॉलनी या परिसरात हा समाज मोठ्या संख्येने आढळतो. 

अत्याधुनिक सुविधा पाहिजे 

सफाई कामगारांच्या पाल्यांसाठी बंद पडलेली झिंगाबाई टाकळी येथील निवासी शाळा सुरू करण्यात यावी. तसेच या निवासी शाळेतील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यात यावा. खासगी शाळांची गुणवत्ता असते, त्याच धर्तीवर या शाळांची गुणवत्ता टिकवण्यासाठी अत्याधुनिक सुविधा शासनाने उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे सामाजिक कार्यकर्ते उमेश पिंपरे म्हणाले. 

सफाई कामगारांच्या पाल्यांना विविध शिक्षणसुविधा देणे तसेच स्पर्धा परीक्षांमध्ये या विद्यार्थ्यांची संख्या वाढावी यासाठी बार्टीतर्फे विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. पुण्यातील निवासी शाळा उत्तमरीत्या सुरू आहे. नागपुरातील बंद पडलेली शाळाही लवकरच सुरू करण्यात येईल. शाळेची शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी स्वतंत्रपणे नियोजन करण्यात येईल. 
-डॉ. प्रशांत नारनवरे, 
आयुक्त, सामाजिक न्याय विभाग. 

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US OPT Fee : अमेरिकेत शिक्षणानंतर नोकरी करण्याचा मार्ग महागणार? द्यावे लागणार एक कोटींचे OPT शुल्क, भारतीय विद्यार्थ्यांवर मोठा परिणाम

Eknath Shinde Dare Village : शिवसेना पक्ष-धनुष्यबाण चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असतानाच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट दरे गावात दाखल

IND VS AFG 3RD T20I: अभिषेक शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड अन् टीम इंडियाचा धावांचा एव्हरेस्ट! संजू सॅमसनची सलग फिफ्टी...

Elderly Doctor Cheated: वृद्ध महिलेच्या देखभालीच्या बहाण्याने दोन कोटींची फसवणूक

Latest Marathi News Update : महाराष्ट्रासह देशभरातील आजच्या ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT