Ringing to Birds who cured for study in Nagpur  
नागपूर

आता उपचारानंतर पक्ष्यांना रिंगिंग; नैसर्गिक अधिवासात आयुष्याचा अभ्यास करण्यासाठी निर्णय 

राजेश रामपूरकर

नागपूर ः उपचारानंतर बरे झालेले हे पक्षी त्यांच्या नैसर्गिक अधिवासात स्थिरावतात का, ते पूर्वीसारखेच आयुष्य जगतात का, याचा अभ्यास करण्यासाठी पहिल्यांदाच येथील ‘ट्रान्झिट ट्रिटमेंट’ केंद्राने उपचार केलेल्या पक्ष्यांचा रिंगिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षी प्रेमींना व अभ्यासकांना त्याचा अभ्यास करण्यासाठी उपयोग होणार आहे. उपचारानंतर पक्ष्यांना रिंगिंग करण्याच्या दिशेने टाकलेले हे पहिले पाऊल आहे.

माळढोक, गिधाड यांसारख्या अनेक पक्षी प्रजातीचा मागोवा घेण्यासाठी त्यांच्या पायाला ‘रिंग’ लावली जाते. त्यात असलेल्या ‘चीप’च्या माध्यमातून त्या पक्ष्याच्या भ्रमंतीदरम्यानची सर्व माहिती संशोधकांना मिळते.

स्थलांतरित पक्ष्यांवर संशोधन करतानाही हीच पद्धत वापरली जाते. आता नागपुरातील सेमिनरी हिल्सवरील वनखात्याच्या ‘ट्रान्झिट ट्रिटमेंट’ केंद्रात उपचारासाठी येणाऱ्या आणि उपचारानंतर बऱ्या झालेल्या पक्ष्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यापूर्वी ‘रिंग’ लावली जाणार आहे. यात दुर्मीळ पक्षी, स्थलांतरित पक्षी आणि संकटग्रस्त पक्ष्यांना प्राधान्याने ही ‘रिंग’ लावली जाणार आहे.

या केंद्राने शेकडो पक्ष्यांना जीवदान देत त्यांना नैसर्गिक अधिवासात मुक्त केले आहे. स्थानिक, स्थलांतरित, दुर्मीळ पक्षी या केंद्रात ठिकठिकाणाहून उपचारासाठी येत असतात. मात्र, उपचारानंतर नैसर्गिक अधिवासात गेलेल्या या पक्ष्यांचे काय होते याविषयी माहिती नसते. हा प्रयोग पक्षी अभ्यासकांसाठी देखील महत्त्वाचा ठरणार आहे. 

पक्ष्यांचे अधिवास संपुष्टात येत असताना त्याच्या संवर्धनासाठी या प्रयोगामुळे मदत होणार आहे. अनेक पक्षी नामशेष होत असताना त्यांच्यावरील अभ्यासासाठी त्यांना ‘रिंगिंग’केले जाते. यामध्ये असणाऱ्या ‘चीप’च्या माध्यमातून संशोधकांना त्या पक्ष्याची माहिती मिळते. त्याच धर्तीवर हा उपक्रम राबविण्यात येत आहे असे वन विभागाने कळविले आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Cup 2025: हाच तो क्षण! हरमनप्रीतने टीम इंडियासह उंचावली ट्रॉफी; सेलिब्रेशन अन् स्वप्नपूर्तीचे क्षण, पाहा Video अन् Photo

ICC Announced Prize for India : वर्ल्ड कप विजयाची ट्रॉफी अन् कोट्यवधीचं बक्षीस! भारतीय महिला क्रिकेटपटूंसाठी आयसीसीची मोठी घोषणा...

Amol Muzumdar: भारतासाठी खेळण्याची संधी मिळाली नाही, पण आता World Cup विजेता कोच; महिला संघाच्या यशामागचा हिरो

India won Women’s World Cup: दीप्ती शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड! भारतीय महिलांनी इतिहास रचला, रोहित शर्मा रडला; Video Viral

World Cup 2025: 'आता विजयाची सवय लावायची...' वर्ल्ड कप विजयानंतर काय म्हणाली कॅप्टन हरमनप्रीत कौर?

SCROLL FOR NEXT