road accident road accident
नागपूर

आईने फोडला हंबरडा; शुभम डोळे उघड रे बाळा... एकदा तरी बोल

बँडच्या तालात वरात निघाल्यावर रस्त्यावर येताच चिमुकल्याला समोरून भरधाव येणाऱ्या बसने धडक दिली

मंगेश गोमासे

नागपूर : लग्नाच्या वरातीत नाचत असलेल्या चिमुकल्याला खासगी बसने चिरडल्याची घटना बुधवारी (ता. २२) १२ वाजताच्या सुमारास उमरेड मार्गावरील (Road Accident) विहीरगाव परिसरात कान्हा सेलिब्रेशन हॉल जवळ घडली. या घटनेने परिसरात तणाव निर्माण झाला. यावेळी नातेवाइकांनी बसची तोडफोड करीत आक्रोश व्यक्त केला. शुभम साजन काकडे (५) असे अपघातात मृत (Road Accident) झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे.

सालई मोकासा, पारशिवनी निवासी साजन काकडे व्यवसायाने शेतकरी आहे. बुधवारी त्यांच्या साळ्याचे लग्न कान्हा सेलिब्रेशन सभागृहात होते. त्या निमित्ताने काकडे परिवार साळ्याचे लग्न असल्याने नागपुरात आले होते. जबाबदारी शुभमचे वडील साजन यांच्यावरच होती. सभागृहात वधूसह पाहुणे वराच्या आगमनाच्या प्रतीक्षेत होते.

बँडच्या तालात वरात निघाल्यावर रस्त्यावर येताच अचानक वरातीतून चिमुकल्याला समोरून भरधाव येणाऱ्या खासगी बसने (एच.के.जी.एन. ट्रॅव्हल्स) धडक दिली. त्यात गंभीररीत्या जखमी झाल्याने शुभमला उपचारासाठी भांडेवाडी येथील ग्रेसीयस हॉस्पिटल येथे नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्यामुळे काकडे परिवारात शोककळा पसरली. लग्नाच्या आनंदावर दुःखाचा डोंगर कोसळला.

बसची तोडफोड, काही वेळ तणाव

शुभमच्या मृत्यूने लग्नसमारंभातील पाहुणे आक्रमक झाले. लोकांना संताप पाहता बस चालक पळून (Road Accident) गेला. लग्नातील मंडळींनी बसमधील प्रवाशांना खाली उतरविले आणि बसची तोडफोड केली. संतापाचा उद्रेक होण्यापूर्वीच हुडकेश्वर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सार्थक नेहेते पथकासह घटनास्थळी पोहोचले. लोकांना शांत करून बस ताब्यात घेतली. याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला असून, चालकाचा शोध सुरू आहे. वाहन फोडणाऱ्या चार ते पाच संशयित नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

शुभम डोळे उघड रे बाळा... आईने फोडला हंबरडा

लग्नाची वरात सभागृहापासून हाकेच्या अंतरावर होती. पाहुण्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. संगीताच्या तालावर सारेच थिरकत होते. आतषबाजी सुरू होती. मात्र, हा आनंद फार काळ टिकू शकला नाही. काळरूपी बस आली आणि क्षणात चिमुकल्यास घेऊन (Road Accident) गेली. शुभम डोळे उघड रे बाळा... एकदा तरी आईशी बोल असा हंबरडा मातेनी फोडला. लग्नघरचा आनंदा दुःखात बदलला. शुभमच्या अचानक जाण्याने काकडे कुटुंबावर दुःखाचा डोंगरच कोसळला. सभागृहातील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दुःखाचे सावट होते. शुभमची आई अबोल झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Garden Waste Scam : पुणे महापालिकेच्या उद्यान कचरा प्रकल्पात ३८ कोटींचा गैरव्यवहार? माजी नगरसेवकांचा ठेकेदारावर गंभीर आरोप

Police Negligence: संशयिताऐवजी भलत्यालाच अटक; ज्येष्ठाची ८८ दिवस कारागृहात ससेहोलपट ; राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांचा आरोप

NEET Protest: बिहार सरकार आंदोलकांसमोर झुकलं! गुन्हे मागे घेण्याचा निर्णय, अटकेत असलेल्यांची सुटका

RTE Admissions Probe: आरटीई प्रवेशातील गैरप्रकारांवर सर्वत्र चौकशी; जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांची सभेत ग्वाही

Pune HCMTR Ring Road : पुण्यातील वाहतूक प्रकल्पांना गती; एचसीएमटीआर, रिंगरोड व पाताळलोक बोगद्यांसाठी मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट आदेश

SCROLL FOR NEXT