Robbery in Royal bar in nagpur
Robbery in Royal bar in nagpur  
नागपूर

धक्कादायक प्रकार! नागपुरात तलवारीच्या धाकावर लुटले बार; CCTV व्हिडीओ झाला व्हायरल  

अथर्व महांकाळ

नागपूर : नागपूर शहरात गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. प्रत्येक दिवशी चोरी, मारामारी, लूट  आणि खुनाच्या घटना समोर येत आहेत. तयामुळे गुन्हेगारांची हिंमत चांगलीच वाढली आहे. शहरातील जरीपटका भागातील एका बारमध्ये असाच एक धक्कादायक  प्रकार घडला आहे.  

नागपूरच्या जरीपटका भागात रॉयल बारमध्ये अज्ञात आरोपींनी लुटमार केली. फक्त लुटमारच नाही तर आरोपी तरुणांनी चक्क तलवारीचा धाक दाखवत बार लुटला. याचा एक व्हिडिओही समोर आला आहे.

आरोपी तरुण तलावारीचा आणि धारदार शस्त्राचा धाक दाखवत बार लुटताना या व्हिडिओमध्ये दिसत आहेत. अचानक घडलेल्या या घटनेमुळे बारमधील लोकांनी मोठी तारांबळ उडाली. जीव वाचवण्यासाठी सगळेजण धावपळ करताना दिसत आहेत. 

रॉयल बारमध्ये आरोपी घुसले आणि तलवार आणि अन्य शस्त्राच्या धाकावर काउंटरवर जाऊन पैशांची लुट केली. रोकड आणि दारूच्या बाटल्या घेऊन फरार झाले. ही संपूर्ण घटना बारच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. आरोपींनी पळ काढताच  बार मालकाने पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली. .

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला आणि सीसीटीव्हीच्या आधारे संपूर्ण आरोपींनाही ताब्यात घेतले आहे. आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याची पोलिसांनी माहिती दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Virtual Campaign: अटक केलेल्या राजकीय नेत्यांना व्हर्च्युअल प्रचाराची परवनगी मागणारी याचिका हायकोर्टाने फेटाळली

Goldy Brar Death: सिद्धू मूसवाला हत्याकांडाच्या मास्टरमाईंडची अमेरिकेत गोळ्या झाडून हत्या

Bumble : आता 'लेडीज फर्स्ट' नाही, तर पुरूषांनाही मिळणार समान संधी.. बम्बल डेटिंग अ‍ॅपने केली मोठी घोषणा!

Salman Khan : गोळीबार प्रकरणातील आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू ; गळफास घेऊन आयुष्य संपवण्याचा केला होता प्रयत्न !

China Highway Collapsed: चीनमध्ये भीषण दुर्घटना! हायवे कोसळल्यानं 19 ठार, डझनभर जखमी

SCROLL FOR NEXT