Sale of liquor from milk cans in Nagpur district 
नागपूर

सकाळीच दुधाच्या कॅनसह पडायचा बाहेर; गावकऱ्यांना संशय आल्याने अघडकीस आला हा प्रकार...

सकाळ वृत्तसेवा

कळमेश्‍वर (जि. नागपूर) : कोरोना विषाणुमुळे देशात लॉकडाउन सुरू आहे. नागरिकांना घराबाहेर निघणेही कठीण झाले आहे. मात्र, जीवनावश्‍यक वस्तूंचे दुकान सुरू असल्याने थोडाफार दिलासा मिळाला आहे. यामुळे नागरिक कोणत्या ना कोणत्या कारणाने बाहेर पडत आहेत. याची पोलिसांनाही चांगलीच कल्पना आहे. मात्र, दारुड्यांचे चांगलेच हाल होत आहे. अशात तळीरामांची सोय करणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. 

लॉकडाउनमुळे नानाविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. याचा सर्वाधिक त्रास हा दारुड्यांना होत असल्याचा दिसून येतो. दारू मिळत नसल्याने रोज दारू पिणाऱ्यांचे चांगलेच हाल होत आहेत. यामुळे तळीरामांनी तहानलेल्या मनाला शांत करण्यासाठी मोहाच्या दारूकडे आपला मोर्चा वळलेला आहे. कवडीमोल भावामध्ये विकली जाणारी मोहाची दारू आता देशी दारू पेक्षा जास्त किमतीत विकली जात आहे. हे सर्व लॉकडाउनमुळे शक्‍य झाले आहे.

लॉकडाउन सुरू होण्यापूर्वी दारूडे मोहाच्या दारूकडे पाहतही नव्हते. देशी व विदेशीतच ते खुश राहायचे. मात्र, देशात कोरोनाचा शिरकाव झाला आणि सर्वकाही बंद झाले. दारूच मिळत नसल्याने दारुड्यांना त्रास हाऊन लागला. अनेकजण सॅनिटायझरवर आपली दारूची तहान भागवत आहेत. तर अनेकांनी मोहाच्या दारूकडे धाव घेतली आहे. अचानक मागणी वाढल्याने मोहाच्या दारूची तस्करी सुरू झाली आहे. अशीच तस्करी करणाऱ्याला पोलिसांनी अटक केली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोंडखैरी परिसरात मोठ्या प्रमाणात मोहफूल दारूच्या हातभट्टी सुरू आहेत. गेल्या काही दिवसांपासून दुधाच्या कॅनमध्ये मोहफुलाच्या दारूची सावली-मावलीमार्गे नागपूर शहरात वाहतूक होत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांना मिळाली होती. ग्रामस्थांनी ही माहिती कळमेश्‍वर पोलिसांना दिली. पोलिस व ग्रामस्थांनी मिळून योजना आखली आणि पाळत ठेवली.

शुक्रवारी सकाळी जुबेर जब्बार खान (वय 27, रा. वॉर्ड क्रमांक 10, कळमेश्‍वर) हा दारूची तस्करी करीत असताना आढळला. ग्रामस्थांच्या मदतीने पोलिस हवालदार महेश बिसेन यांनी त्याला रंगेहात ताब्यात घेतले. दुधाच्या कॅनची तपासणी केली असता त्यात सहा हजार सहाशे रुपयांची मोहफुलाची दारू आढळली. पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून मोटारसायकलसह 52 हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

दुधाच्या कॅनचा वापर

लॉकडाउनमुळे सर्वकाही बंद आहे. जीवनावश्‍यक वस्तू सोडल्यातर अन्य सामानांच्या विक्रीवर बंदी आहे. जीवनावश्‍यकमध्ये दुधाचाही समावेश आहे. मात्र, याचाच गैरवापर होत असल्याचे समोर आले आहे. मोहफुलाची दारू विकण्यासाठी दुधाचा वापर करणाऱ्यारा पोलिसांनी अटक केली. ही कारवाई गोंडखैरी येथे शुक्रवारी करण्यात आली.

मोहफुलाच्या दारूला मागणी

लॉकडाउनमुळे दारूचे दुकान बंद असल्याचे मोहफुलाच्या दारूला चांगलीच मागणी आहे. दारूडे एक घुट दारूसाठी वाट्टेल ती किंमत मोजायला तयार आहे. त्यामुळे याची तस्करी वाढली आहे. दारुड्यांचे शौक पूर्ण करण्यासाठी दुधाच्या कॅनचा वापर होत असल्याने पोलिसांची चिंता आणखीनच वाढली आहे. विश्‍वास करावा तर कुणावर, असाच प्रश्‍न त्यांचा मनात उपस्थित होत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG, 1st ODI: भारताने उडवला अफगाणिस्तानचा धुव्वा; कर्णधार गिलची शानदार फिफ्टी, तर केएल राहुलची 'क्लास' फिनिश

Pune Fraud News : गुंतवणुकीच्या आमिषाने १२ कोटींची फसवणूक; पुण्यातील ४६ गुंतवणूकदारांची फसवणूक

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंच्या पथकाची स्वारगेट बस स्टॉपवरील दुकानांवर धाड; ...तोपर्यंत दुकानं बंद ठेवण्याच्या सूचना

Gas Cylinder Shortage : खाद्यपदार्थांच्या दरात वाढ! दरवाढीमुळे हॉटेल व्यवसाय ‘गॅस’वर; बचतीसाठी शेगड्यांचा वापरही कमी

Modi-Trump Meeting: डोनाल्ड ट्रम्प-नरेंद्र मोदी यांची भेट ठरली; व्हाईट हाऊसची मंजुरी, 'या' मुद्द्यांवर होणार चर्चा

SCROLL FOR NEXT