Sameer Kale set up a cloth bank on social media
Sameer Kale set up a cloth bank on social media 
नागपूर

सोशल मीडियावरून उभारली ‘कपडा बॅंक’; समीर काळेंनी गरिबांच्या चेहऱ्यावर फुलविले हास्य

नीलेश डाखोरे

नागपूर : आजच्या घडीला प्रत्येकजण सोशल मीडियाचा वापर करीत आहे. खरं सांगायच झाल तर जीवनच सोशल मीडियावर आलं आहे. मात्र, याचा चांगल्या गोष्टीसाठी कमी आणि वाईट गोष्टींसाठी जास्त वापर होताना दिसत आहे. हा प्रत्येकाचा खासगी विषय असली तरी याला शिक्षक समीर मुरलीधर काळे अपवाद ठरले आहेत. त्यांनी सोशल मीडियाचा वापर करून गरिबांसाठी चक्क ‘कपडा बॅंक’ अघडली. कपडे दान करीत गरिबांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याचे कार्य ते करीत आहे.

संत मायकल प्राथमिक शाळेचे शिक्षक व वसुंधरा प्रतिष्ठानचे नागपूर प्रमुख काळे यांनी समाजाला काही देणे लागते या उद्देशातून ‘कपडा बॅंक’ उघडली आहे. सुरुवातीला कपडे देण्यासाठी नागरिकांना आवाहन केले. कालांतराने फेसबुक, व्हॉटसॲप, ट्विटर आदींच्या माध्यमातून वापरात नसलेले जुने व नवीन पण स्वच्छ आणि धुतलेले कपडे देण्याचे आवाहन त्यांनी केले.

अल्पावधीतच त्यांना यश आले असून, नागरिक त्यांना फोन करून कपडे घेऊन जाण्यास बोलवित असतात. दरवर्षी गरीब, गरजू व आदिवासी गरीब मुला-मुलींना या कपड्यांचे वाटप ते करीत असतात.

आरोग्यमित्र म्हणूनही समीर काळे यांची ओळख आहे. नागपुरात विदर्भातील रुग्ण उपचारासाठी येतात. कुणाचाही फोन आल्यास ते मदतीसाठी धावून जातात. समाजाल आपल काही देण लागते याच विचारातून ते गरिबांच्या मदतीसाठी धावून जातात. कुणाच्याही मदतीसाठी ते सदैव तत्पर असतात.

गरिबांची मदत करण्याचे मी ठरवले
गरिबी माझ्याकडून बघितली जात नाही. कोणीही गरीब राहू नये असे माझे वैयक्तिक मत आहे. हे शक्य नसले तरी गरिबांची मदत करण्याचे मी ठरवले आहे. त्यासाठी माझी धडपड सुरू असते. नागपूर शहरामध्ये २५ कपडा बॅंक केंद्र सुरू करण्याचा मानस आहे. मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी मातृदिनी मुलींना जन्म देणाऱ्या मातांना साड्यांचे वाटप केले.
- समीर काळे,
शिक्षक व समाजसेवी

गरिबांची सेवा हे कर्तव्य

आरोग्यमित्राची प्रेरणा आमदार बच्चू कडू यांच्याकडून मिळाली. मेडिकल, मेयो व खासगी रुग्णालयात बाहेर गावावरून आलेल्या रुग्णांची सेवा करणे, रक्‍त उपलब्ध करूने देणे, गरीब रुग्णांना घरून जेवनाचा डब्बा पोहोचवने हे आपले कर्तव्य असल्याचे समीर काळे म्हणतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati Lok Sabha Election : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; पंजाबची गळती सुरू जवळपास निम्मा संघ गारद

Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा भगवान कुबेरांशी काय संबंध आहे? जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT