Sandip Joshi and 7 others canceld their application in graduate constituency election  
नागपूर

पदवीधर मतदारसंघ निवडणूक: संदीप जोशी यांच्यासह सात उमेदवारांनी घेतली माघार

राजेश चरपे

नागपूर : अपक्ष उमेदवार अभिजित वंजारी यांचा अर्ज पडताळणीत बाद झाल्यानंतर संदीप जोशी यांच्यासह सात उमेदवारांनी पदवीधरच्या रिंगणातून आज माघार घेतली. नामसाध्यर्म्यामुळे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार अभिजित वंजारी आणि भाजपचे संदीप जोशी यांच्या मतांमधील विभाजन टळले आहे.

उमेदवारी मागे घ्यायच्या शेवटच्या दिवशी संदीप जोशी (अपक्ष), धर्मेश फुसाटे (अपक्ष), गोकुलदास पांडे (अपक्ष), शिवाजी सोनसरे (अपक्ष), सचिदानंद फुलेकर (अपक्ष), प्रा. किशोर वरभे (लोकभारती) व रामराव ओमकार चव्हाण (अपक्ष) यांनी आपली दावेदारी परत घेतली. याचा फटका आणि फायदा कोणाला होतो हे मतदानाच्याच दिवशी कळेल. 

आता एकूण १९ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. विधान परिषदेच्या पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीकरता मंगळवारला अर्ज मागे घेण्याची शेवटी तारीख होती. पदवीधर निवडणुकीसाठी एक डिसेंबरला मतदान होणार असून तीन डिसेंबरला मतमोजणी होईल. या मतदार संघावर आतापर्यंत भाजपचे वर्चस्व राहिले आहे. 

गेल्यावेळी भाजपने तत्कालीन महापौर अनिल सोले यांना उमेदवारी दिल्यानंतर विद्यमान महापौर संदीप जोशी यांना उमेदवारी दिली आहे. तर कॉंग्रेसकडून ॲड. अभिजित वंजारी यांना उमेदवारी दिली आहे. या निवडणुकीसाठी ३१ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यातील ६ जणांचे अर्ज अवैध ठरले तर २६ जणांचे अर्ज वैध ठरले होते. यातून आज सातजण गळाले आहेत.

आता लढती स्पष्ट झाल्याने उमेदवार प्रचाराला लागले आहेत. सर्वच उमेदवारांनी गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया येथून प्राधान्याने प्रचाराला सुरुवात केली आहे. शेवटच्या टप्प्यात नागपूर जिल्ह्यात संपूर्ण लक्ष केंद्रित केले आहे. भाजपसाठी ही प्रतिष्ठेची लढत आहे. या मतदारसंघात भाजप आजवर अपराजित राहिली आहे. 

केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत ही जागा संदीप जोशी यांना कायम राखावी लागणार आहे. काँग्रेसचे अभिजित वंजारी दोन वर्षांपासून येथे मशागत करीत आहे. विधानसभेऐवजी त्यांनी पदवीधरवर आपले लक्ष केंद्रित केले आहे. येथे ऐतिहासिक कामगिरी करण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. विशेष म्हणजे यंदा या मतदारसंघात बसपचा उमेदवार नाही. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी किती मजल मारते हेसुद्धा निकालाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी! , सरकारने 'त्या' महिलांना योजनेचा लाभ देणे केले बंद

Shubman Gill Video: इंग्लंडच्या गोलंदाजाने केला गिलचा फोकस हलवण्याचा प्रयत्न; मग भारताच्या कर्णधारानं काय केलं पाहाच...

Shiv Yog 2025: उद्या शिवयोगाचा दुर्मिळ योग, धनु राशीसह 5 राशींवर माता लक्ष्मीची राहील कृपादृष्टी

BPSC Clerk Recruitment: 12वी पास तरुणांसाठी सुवर्णसंधी! BPSC मार्फत क्लार्क पदासाठी भरती जाहीर; जाणून घ्या पगार किती मिळेल?

निलेश साबळे 'चला हवा येऊ द्या २' मध्ये का दिसणार नाही? खरं कारण समोर, म्हणाला, 'गेले सहा महिने...

SCROLL FOR NEXT