dr. sachitanand joshi.jpeg 
नागपूर

लुप्त होणाऱ्या लिपींचे संवर्धन गरजेचे

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : काश्‍मिरी संस्कृतीची नोंद असलेल्या शारदा लिपी भारतीयांनाच माहिती नाही. काश्‍मीर भारताचे अंग असूनही लोक तेथील संस्कृतीचा अभ्यास करीत नाहीत. जोपर्यंत भारतीय शारदा लिपी शिकणार नाहीत, तोपर्यंत काश्‍मिरातील हिंदू संस्कृतीचे महत्त्व प्रकाशात येणार नाही. शिवाय ब्राह्मी व मोडीचे संरक्षण गरजेचे असल्याचे प्रतिपादन हस्तलिखितांचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सच्चिदानंद जोशी यांनी केले.
झील फाउंडेशनच्या दुसऱ्या नागपूर लिटररी फेस्टिव्हलच्या दुसऱ्या दिवशी "भारत की पांडुलिपी संपदा : हमारी सांस्कृतिक धरोहर का भंडार' विषयावर डॉ. सच्चिदानंद जोशी यांचे व्याख्यान झाले. याप्रसंगी डॉ. नंदा पुरी उपस्थित होत्या. शिवाय "भारतीय अर्थव्यवस्था और स्वदेशी जागरण मंच की भूमिका' विषयावर डॉ. अश्‍विनी महाजन यांचे व "आयपॉड्‌स, ट्रेड वार्स अँड इंडियाज इकोनॉमिक फ्युचर' विषयावर डॉ. निरंजन राजाध्यक्ष यांचे व्याख्यान झाले. शिवाय "सस्टेनेबिलिटी अँड लिवेबिलीटी अक्रॉस द स्केल्स ऑफ द बिल्ट एनवॉयर्नमेंट' विषयावर डॉ. मानसी बाल भार्गव यांच्या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. भारतीय उद्योग क्षेत्रातील विदेशीकरण रोखण्यासाठी स्वदेशी जागरण मंच कार्यरत आहे.

गत काही वर्षात मंचाला मोठे यश प्राप्त झाले असून, अनेक उद्योजगतातील समस्या सुटल्याचे डॉ. अश्‍विनी महाजन म्हणाले. स्वदेशी जागरण मंचाने केलेल्या खासगी व सार्वजनिक उद्योग क्षेत्रातील कार्याची त्यांनी माहिती दिली. देशातील नेते बदलले की किती आर्थिक नीतीचे नुकसान होते असे डॉ. महाजन म्हणाले. तर देशात मोठ्या प्रमाणात मोबाईल व इलेट्रॉनिक्‍स गॅजेट्‌सची निर्मिती होते आहे. जागतिक बाजारपेठेत या वस्तूंची निर्यात होते. पूर्वी विदेशी वाटणारे तंत्रज्ञान आज भारतीय नावाने विकले जाते त्यामुळे भारताचे जागतिक पटलावर पुनर्निर्माण होते, ही चांगली गोष्ट असल्याचे डॉ. निरंजन राजाध्यक्ष म्हणाले. याप्रसंगी डॉ. कपील चांद्रायण यांनी त्यांची मुलाखत घेतली. प्रसंगी डॉ. दीपाली नायडू उपस्थित होत्या.
"सस्टेनेबिलिटी अँड लिवेबिलीटी अक्रॉस द स्केल्स ऑफ द बिल्ट एनवॉयर्नमेंट' या विषयावर डॉ. मानसी बाल भार्गव यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या परिसंवादात नीना राईचा, केतकी तिडके, अजय थोमारे, विपा जरीवाला, हबीब खान यांनी सहभागा नोंदवला. सोलर पॅनल लावणे म्हणजे ग्रीन बिल्डिंग असा लोकांचा समज असून, यात तथ्य नसते. कारण ग्रीन बिल्डिंगमुळे पर्यावरणाचे संवर्धन होते, असे नीना राईचा म्हणाल्या. भविष्यात नागरिक अशाच बागेची निर्मिती करून भाज्या पिकवतील. अशी संकल्पना लोक स्वीकारत असून, सिंगापूर, शांघाय प्रत्यक्षात दिसत असल्याचे केतकी तिडके यांनी सांगितले. पर्यावरण रक्षणासाठी शहरीकरण थांबवणे उपाय नाही तर प्रत्येकाने त्यासाठी प्रयत्न करावे, असे मत अजय थोमारे यांनी व्यक्‍त केले.
संस्कृती निसर्गाशी कसे वागावे हे सांगते अन्‌ लोक ते स्वीकारतात. त्यातून सर्व सुविधा विकसित झाल्या असून, योग्य उपयोग झाल्यास वास्तुनिर्मिती क्षेत्रात बदल जाणवतील अशा भावना विपा जरीवाला यांनी व्यक्‍त केल्या. देशात लाखोंच्या संख्येने बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या जागृतीचे शासनाने धोरण बनविणे गरजेचे असल्याचे वास्तुविशारद हबीब खान म्हणाले. बाल भार्गव यांनी ग्लोबलायझेशन आणि लोकलायझेशनचा प्रचार गरजेचा असल्याचे मत व्यक्‍त केले. भारतीयांचा प्रवास निसर्ग संवर्धनाच्या दिशेने आता सुरू झाला असल्याचा आनंद त्यांनी व्यक्‍त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ITR Filing Deadline: उद्यापासून 5,000 दंड; ITR भरण्याचा आज शेवटचा दिवस, 5 मिनिटांत स्वतः फाईल करा

Gold Rate Today : सोने पुन्हा स्वस्त, चांदीचाही भाव कमी, खरेदीपूर्वी जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा ताजा भाव

Sangli IT Bogus Raid : I Am From Income Tax म्हणत मध्यरात्री छापा, डॉक्टरला दीड किलो सोनं अन् १५ लाखांना चुना लावला...

भारतीयांमध्ये खेळाडूवृत्ती नाही...! शाहिद आफ्रिदीने 'Handshake' प्रकरणावर सूर्यकुमार यादव, BCCI ला सुनावले

Jalna Flood: शहरात पावसाचा हाहाकर सीना कुंडलिका नदीला पूर; शहरातील सखल भागात साचले पाणी

SCROLL FOR NEXT