schools are starting from 26 November in Nagpur rural
schools are starting from 26 November in Nagpur rural  
नागपूर

‘ग्रामीण’च्या शाळा २६ नोव्हेंबरपासूनच; ६५७ शाळांचे संपूर्ण निर्जंतुकीकरण

मंगेश गोमासे

नागपूर ः जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील नववी ते बारावीचे वर्ग सोमवार २३ नोव्हेंबरपासून सुरू होणार होते, मात्र कोरोना चाचणीत ग्रामीण भागातील ४१ शिक्षक कोरोना संक्रमित आढळल्याने आता शाळा २६ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी घेतला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्ह्यातील शाळा सुरू करण्यासंदर्भात शिक्षण, आरोग्य व महसूल विभागाची संयुक्त बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेच्या शिक्षण सभापती भारती पाटील, मुख्य कार्यपालन अधिकारी योगेश कुंभेजकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत फडके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. डी. एस. सेलोकार, उपजिल्हाधिकारी डॉ. सुजाता गंधे, विजया बनकर व जिल्हा परिषदेचे अधिकारी उपस्थित होते. 

जिल्ह्यातील आजपर्यंत ४ हजार ५०० शिक्षकांची आरटीपीसीआर कोविड प्राथमिक चाचणी पूर्ण झाली असून, नागपूर ग्रामीणमध्ये ४१ शिक्षक पॉझिाटिव्ह आढळले. काल नागपूर शहरातील १६ शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. रविवारची आकडेवारी उपलब्ध होऊ शकली नाही. 

 एक हजारापेक्षा जास्त शिक्षकांची चाचणी अद्याप झाली नसल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाद्वारे अधिकाऱ्यांची बैठक बोलाविण्यात आली होती. बैठकीत ज्या शाळा सुरू करण्यात येत आहेत, त्या शाळांमध्ये २३ व २४ नोव्हेंबरपर्यंत आवश्यक उपाययोजना पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले. याशिवाय ज्या शाळा सुरू करण्यात येणार आहेत, अशा सर्व शाळांची अधिकाऱ्यांमार्फत तपासणी पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले.

३०० पालक अधिकाऱ्यांची नियुक्ती

सुरू होणाऱ्या शाळांच्या तपासणीसाठी ३०० पालक अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिली. जिल्ह्यातील शाळांमध्ये १ लाख ३० हजार ५७८ विद्यार्थी असून, ५ हजार ७७९ शिक्षक आहेत. त्यापैकी ४१ शिक्षक कोरोना संक्रमित असून त्यांना औषधोपचारासाठी व गृह विलगीकरणासाठी सुटी देण्यात आली. शाळांमध्ये उपस्थित राहण्यासंदर्भात ३३ हजार ३४० पालकांनी संमतीपत्रक दिले असल्याची माहिती मुख्य कार्यपालन अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिली.

अशा उपाययोजनांचा समावेश

कोरोनासंदर्भात करावयाच्या उपाययोजनाअंतर्गत सर्व शाळांना पल्सऑक्सिमिटर, सॅनिटायझर, सोडिअम हायपोक्लोराईड सोलुशन आदी आवश्यकतेनुसार उपलब्ध करून देण्यात आले आहे. विद्यार्थ्याच्या कुटुंबात कुणालाही कोरोनाचे लक्षण नाही याची माहिती घेण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांना कुटुंब माहितीपुस्तिका देण्यात येणार आहे. शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना कोरोनासदृश लक्षणे आल्यास त्यांची तत्काळ आरटीपीसीआर टेस्ट करण्यात येणार आहे. यासाठी मुख्याध्यापकांना दररोज केंद्रप्रमुखांना अहवाल सादर करावयाचा असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

एकत्रीकरणास मज्जाव

शाळा सुरू करताना सामूहिक प्रार्थना होणार नाही तसेच प्रत्येक वर्गाचे वेळापत्रक वेगवेगळे राहणार आहे. सकाळी १० पासून शाळा सुरू होतील. शाळेचा कालावधी ३ ते ४ तास राहील. यात विद्यार्थी एकत्र येणार नाही. सामाजिक अंतर ठेवून तसेच मास्क आवश्यक असणार आहे. शासनाच्या सर्व सूचनांचे तंतोतंत पालन केल्यानंतरच शाळा सुरू करण्यासंदर्भात प्रशासनाला विनंती करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिली.
….. 
संपादन - अथर्व महांकाळ 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

T20 World Cup 2024: 'हार्दिकच्या जागेसाठी मोठी चर्चा, तर सॅमसन...', टीम इंडिया निवडीवेळी काय झालं, अपडेट आली समोर

LSG vs MI IPL 2024 Live : लखनौची सामन्यावर पकड, स्टॉयनिस अन् दीपक हुड्डा लढवला किल्ला

Covishield Vaccine : शरीरात रक्ताच्या गाठी होण्याचा धोका अन् हृदयासह मेंदूवर दुष्परिणाम; कोविशिल्ड लशीमुळे होणारा TTS काय आहे?

KL Rahul T20 WC 2024 : शुन्य दिवसांपासून... भारतीय संघाची घोषणा होताच लखनौने वगळलेल्या केएलसाठी केली पोस्ट

SCROLL FOR NEXT