Severe repercussions of the death of the Corona surveyor teacher 
नागपूर

शिक्षक २० जुलैपासून होते कोरोना सर्वेक्षणाच्या कामात; २० सप्टेंबरलाच आला मृत्यू, तीव्र पडसाद

मंगेश गोमासे

नागपूर : कोरोना सर्वेक्षणात कार्यरत असणारे शिक्षक यांचे बुधवारी (ता. १६) निधन झाले. कोरोनाबाधित झाल्यानंतर ते वानाडोंगरी येथील लता मंगेशकर रुग्णालयात उपचार घेत होते. शिक्षकाच्या निधनामुळे शिक्षकांमध्ये कोरोना सर्वेक्षण कामाविरोधात पुन्हा तीव्र प्रतिक्रिया उमटणे सुरू झाले आहे. याशिवाय शिक्षक संघटना विविध मागण्यांसाठी आक्रमक झाल्या आहेत.

मृत शिक्षक हे हिंगणा रोड येथील बालाजी हायस्कूल येथे कार्यरत होते. कोरोना सर्वेक्षणासाठी मोठ्या संख्येने शिक्षक २० जुलैपासून काम करीत आहेत. मागील आठ दिवसांपासून त्यांची प्रकृती बरी नव्हती. त्यांना लता मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खालावली आणि बुधवारी पहाटे चार वाजताच्या सुमारास त्यांचे निधन झाले. कोरोना सर्वेक्षणात सहभागी असलेल्या शिक्षकाचा हा जिल्ह्यातील पहिला मृत्यू आहे.

मृत शिक्षकांच्या कुटुंबीयांना कोविड योद्धा योजनेअंतर्गत सरकारने ५० लाख रुपयांची मदत करावी. त्याचप्रमाणे कोरोना सर्वेक्षणाच्या कामातून शिक्षकांना तातडीने मुक्त करावे, अशी मागणी शिक्षक संघटनांनी केली आहे. कोरोना सर्वेक्षणासाठी शिक्षकांच्या सेवा अधिग्रहित करावयाच्या आणि ते आजारी पडले की त्यांच्याकडे दुर्लक्ष करावयाचे, असे शासनाचे धोरण असल्याची टीका राष्ट्रवादी शिक्षक संघाने केली आहे.

खाटा आरक्षित असाव्या

सर्वेक्षणाचे कार्य करणारे शिक्षक आजारी पडल्यास त्यांच्यासाठी रुग्णालयात खाटा आरक्षित केल्या जाव्यात, अशी मागणीही संघटनेचे राज्य उपाध्यक्ष पुरुषोत्तम पंचभाई, विभागीय सचिव बाळा आगलावे, अध्यक्ष खेमराज कोंडे यांनी केली आहे. याशिवाय विदर्भ प्राथमिक शिक्षक संघटनेने मिलिंद वानखेडे सरांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री व अर्थमंत्र्यांना विभागीय आयुक्तांमार्फत बुधवारी (ता. १६) दिलेल्या निवेदनातून करण्यात आली होती.

ई-मेल संघटनेला प्राप्त

शुक्रवारी (ता. १८) मुख्यमंत्री व अर्थमंत्री यांनी निवेदनाची दखल घेतली आहे. अपर मुख्य सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग व आरोग्य विभागाकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविले आहे. तसा ई-मेल संघटनेला प्राप्त झाला आहे.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईत ४ नवीन पोलीस ठाणी, ३ DCP झोन आणि २ ACP विभाग होणार, १,४४८ नव्या पदांना मंजुरी; गृह विभागाचा मोठा निर्णय!

IPL 2026: वैभव सूर्यवंशीसाठी राजस्थान रॉयल्सने नव्हे, तर 'या' टीमने लावलेली पहिली बोली... आज त्या संघाचं चित्र वेगळं असतं

MPSC Result Exam : एमपीएससीचा निकाल लागला! सोलापूर जिल्ह्याच्या 'विजय'ची बाजी; पाहा एका क्लिकवर यादी

Vaibhav Suryavanshi: या पोरात काहीतरी खास आहे; फक्त त्याला पाहण्यासाठी मी आणि माझी बायको...' R Ashwin झाला जबरा फॅन

Pune Warje News: पुण्यात भरधाव मद्यधुंद कारचालकाचा कहर; वाहनांना धडक देत पोलिसांना चकवण्याचा व अपहरणाचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT