She wanted to give her life but ... 
नागपूर

तिला द्यायचा होता जीव पण...

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : धडधडत येणाऱ्या रेल्वेसमोर वयस्कर महिलेने स्वत:ला झोकून दिले. ही घटना बघणाऱ्या सर्वांचाच श्‍वास रोखला जाण्यासोबतच अंगाचा थरकापही उडाला. इंजिनचालक व सहचालकाने प्रसंगावधान राखत इमजन्सी ब्रेक लावले. महिलेपासून अगदी दीडफूट अंतरावर रेल्वे थांबल्याने तिचे प्राण वाचले. सोमवारी दुपारी घडलेल्या या घटनेनंतर नागपूर रेल्वेस्थानकावर एकच खळबळ उडाली.

आत्महत्येचा प्रयत्न करणारी 55 वर्षीय महिला मोमिनपुऱ्यातील रहिवासी आहे. सोमवारी दुपारी नागपूर स्थानकावर आली. फलाट क्रमांक 6 वर मुंबई एंडच्या दिशेने फारशी वर्दळ नसलेल्या ठिकाणी जाऊन बसली. दुपारी 2.45 वाजताच्या सुमारास 22620 तिरुनवेल्ली-बिलासपूर एक्‍स्प्रेस धडधडत फलाटावर येत होती. यामुळे प्रवाशांचीही गर्दी होती. गाडी जवळ येताच गर्दीतून वाट काढत महिलेने रुळावर उडी घेतली. फलाटावर उभ्या प्रत्येकाचाच श्‍वास रोखला गेला. हृदयाची धडधड अनेक पटींनी वाढली. इंजिनचालक आर. पी. सरदार, सहायक चालक डी. मंडल यांनी क्षणाचाही विलंब न करता ब्रेक लावला. काही वेळातच गाडी थांबली. नीलम आणि गाडीदरम्यान केवळ दीड फुटाचे अंतर होते. गाडी थांबल्याचे बघताच वडिलांना सोडण्यासाठी आलेले जरीपटका येथील रहिवासी राम पंजवानी यांनी महिलेला फलाटावर ओढून घेतले. माहिती मिळताच उपस्टेशन व्यवस्थापक अतुल श्रीवास्तव आणि सतीश ढाकणे यांनी सुरक्षा व्यवस्थेला सूचना दिली. त्यानुसार जीआरपी आणि आरपीएफचे जवानही दाखल झाले. चौकशीत महिला कौटुंबिक वादातून तणावात असल्याचे स्पष्ट झाले. काही वेळानंतर शांत होताच लोहमार्ग पोलिसांनी तिला घरी पोहोचवून दिले.
लोहमार्ग पोलिसांकडून घटनेबाबत कमालीची गोपनीयता पाळण्यात आली. काही झालेच नसल्याचे सांगण्यात आले. अधिक विचारणा केली असता ही आमच्यासाठी नेहमीची आणि किरकोळ बाब असल्याचे असंवेदनशील उत्तर मिळाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT