Sickle cell electrophoresis test closed
Sickle cell electrophoresis test closed sakal
नागपूर

सिकलसेल आजाराची इलेक्ट्रोफोरेसिस चाचणी बंद

राज इंगळे

अचलपूर : सिकलसेल आजाराची खात्री करण्यासाठी रुग्णांची इलेक्ट्रोफोरसिस नावाची चाचणी केली जात होती. मात्र मागील तीन महिन्यांपासून या चाचणीसाठी संच संपल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. ही चाचणी १०० टक्के खात्रीची नसल्याने ती बंद करण्यात आल्याची माहिती मुंबई येथील डॉक्टरांनी दिली आहे.

सिकलसेल हा आनुवंशिक व रक्तदोषामुळे उद्भवणारा दुर्धर आजार आहे. या आजाराची खात्री करण्यासाठी इलेक्ट्रोफोरसिस नावाची तपासणी करण्यात येत होती. मात्र या तपासणीसाठी वापरण्यात येणारे संच तीन महिन्यांपासून संपलेले आहेत. याबाबतचे वृत्त ‘सकाळ’मध्ये प्रकाशित करण्यात आले होते. त्यानंतर या समस्येचे निराकरण करण्यासाठी मुंबई येथील सिकलसेल विभागाशी संपर्क साधत खरे कारण शोधण्याचा प्रयत्न केला असता इलेक्ट्रोफोरसिस तपासणी खात्रीची नसल्याने ती संपूर्ण राज्यात बंद करण्यात आली आहे. त्याऐवजी शंभर टक्के खात्रीची एचपीएलसी नावाची तपासणी राज्यातील २१ जिल्ह्यांत सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई येथील सिकलसेल विभागाचे डॉ. केंद्रे यांनी दिली. राज्यात यापुढे इलेक्ट्रोफोरसिस तपासणी बंद होणार, याबाबत जिल्हास्तरावरील सिकलसेल विभागाला कोणतीच कल्पना नाही, हे विशेष.

सिकलसेल आजाराचे स्वरूप

सिकलसेल हा रक्तातील लाल रक्तपेशीमध्ये होणारा आनुवंशिक आजार आहे. मानवी रक्तात लाल व पांढऱ्या अशा दोन प्रकारच्या पेशी असतात. या दोन प्रकारच्या पेशींपैकी लाल रक्तपेशींचा आकार गोल असतो. सिकलसेल आजारात लाल रक्तपेशींना ऑक्सिजन मिळत नाही. त्यामुळे या पेशींचा आकार विळ्यासारखा होतो. गर्भधारणेच्या वेळी होणाऱ्या आनुवंशिक बदलांमुळे हा आजार होतो.

सिकलसेल, थॅलेसेमिया आजाराची मुले यापुढे जन्माला येऊ नये, हा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून राज्यात इलेक्ट्रोफोरसिस तपासणी बंद करण्यात आली आहे. त्याऐवजी राज्यातील २१ जिल्ह्यांत शंभर टक्के खात्री असलेली एचपीएलसी तपासणी केंद्र सुरू केले जातील. त्यासाठी निविदा प्रक्रिया तयार आहे. लवकरच केंद्र सुरू करण्यात येणार आहेत.

- डॉ. महेंद्र केंद्रे, सिकलसेल विभाग, मुंबई

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT