small girl died while giving the injection Government medical collage news 
नागपूर

इंजेक्शन देताच चिमुकलीचा मृत्यू; इंटर्नच्या भरवशावर कारभार चालत असल्याचा नातेवाईकांचा आरोप

केवल जीवनतारे

नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) लहान मुलांच्या अतिदक्षता विभागात उपचारासाठी भरती असलेल्या तीन वर्षीय चिमुकलीचा चुकीचे इंजेक्शन दिल्याने मृत्यू झाला असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. रविवारची ही घटना आहे. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेची माहिती मिळताच अजनी येथील पोलिस अतिदक्षता विभागात पोहोचले. पोलिसांच्या मध्यस्थीने तणाव निवळला. मात्र, या प्रकरणाची तक्रार करायची असल्यास नातेवाईकांनी पोलिस ठाण्यात यावे अशी सूचना देत पोलिस निघून गेले. या प्रकरणाची पोलिस तक्रार झाली की, नाही हे मात्र कळायला मार्ग नाही.

अवघं तीन वर्षांच वय असलेल्या संजनाला (नाव बदलले) मेडिकलच्या लहान मुलांच्या अतिदक्षता विभागात दाखल केले. मात्र, तिला मेंदूचे झटके आले. यामुळे तिला इंजेक्शन दिले. इंजेक्शन दिल्यानंतर काही वेळातच तिचा मृत्यू झाला. यामुळे नातेवाईकांनी काही वेळ गोंधळ घातला. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

मेडिकलमध्ये दर दिवसाला कोरोनाचे शेकडो रुग्ण उपचारासाठी येतात. याशिवाय गैर कोरोनच्या रुग्णांची गर्दी होते. तर सारे मनुष्यबळ कोरोनासाठी वापरण्यात येत असल्याने गैरकोरोना रुग्णांकडे फारसे लक्ष देण्यात येत नाही, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. अप्रशिक्षित असलेल्या इंटर्नच्या भरवशावर येथील व्यवस्था असल्याचा आरोपही नातेवाईकांनी केला.

समिती बसवून सखोल चौकशी करू
असा काही प्रकार घडला असल्याचे अद्याप कानावर आले नाही. मात्र, यासंदर्भात माहिती घेतो. समिती बसवून सखोल चौकशी करू. प्रसंगी शवविच्छेदन करून त्यातून सत्य काय ते पुढे येईलच.
- डॉ. अविनाश गावंडे,
वैद्यकीय अधिक्षक, मेडिकल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Adani Group News : अदानी समूहाला मोठा दिलासा; 'SEBI'ने 'हिंडेनबर्ग'चे आरोप फेटाळले!

AFG vs SL Live : 6,6,6,NB,6,6,1w! ४० वर्षीय मोहम्मद नबीची वादळ खेळी; ६ चेंडूंत केलेल्या ५ धावा, नंतर १६ चेंडूंत ५५ धावांचा पाऊस Video

Crime News : लोणी काळभोर येथील पाच अट्टल गुन्हेगार दोन वर्षासाठी पुणे शहर, पिंपरी चिंचवड, पुणे ग्रामीण जिल्ह्यातून तडीपार

Rahul Gandhi: दुसरी पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधींनी काय सिद्ध केलं? निवडणूक आयोगाला दिलेला अल्टिमेटम नेमका काय आहे?

Pune Encroachment : शहरातील हजारो चौरस फुटावरील अतिक्रमण हटवले

SCROLL FOR NEXT