Smuggling of wine are in form in Nagpur District  
नागपूर

अद्दा आणि पव्व्याने उडवली गावकऱ्यांची झोप; पोलिस प्रशासन कुंभकर्णी झोपेत

अनिल ढोके

मोवाड (जि. नागपूर):  शहरात अनेक ठिकाणी अवैध देशी दारूविक्रीला जोर आला आहे. पोलिस प्रशासन कुंभकर्णी झोपेत असल्याने नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. या ठिकाणी सायंकाळपान रात्री उशीरापर्यंत खुलेआम देशी दारूची अवैध विक्री केली जात आहे. 

परिणामी कामगार युवकांना दारूचे व्यसन जडले आहे. दारूला ग्राहकी चांगली असून आर्थिक उत्पन्नही बऱ्याच प्रमाणात मिळत असल्यामुळे अनेक बेरोजगार युवकांनी या व्यवसायात उडी घेतली आहे. मद्यपी मद्य प्राशन करून सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करीत असल्यामुळे रस्त्याने ये-जा करणाऱ्या कामगारवर्ग व वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तक्रार देण्यास कुणीही पुढे येत नसल्यामुळे मद्यपीचा त्रास वाढला आहे.

व्यसनामुळे भांडणाचे प्रमाण वाढले असून व दारूची खुलेआम विक्री थांबविण्यासाठी कुणीही पुढाकार घेत नसल्यामुळे नागरिकांत नाराजीचा सूर उमटत आहे.

मोवाड हे नगरपरिषदेचे गाव आहे. येथील लोकसंख्या आजघडीला दहा हजाराच्या घरात असून येथे दोन शासकीय बार व दोन देशी दारू चिल्लर विक्रीची दुकाने आहेत. ही दुकाने आपल्या शासकीय वेळेत उघडतात व वेळेतच बंद होतात. तरी मात्र उशिरापर्यंत मद्यपींना दारू मिळते कुठून, हा चर्चेचा विषय आहे. विविध ठिकाणी दिवसभर मोलमजूरीने काम करून आलेले मजूर व कामगार दारूवरच खर्च करीत असतात. त्यामुळे अनेक संसार उघड्यावरच दिसत आहेत. खुलेआम दारूविक्री करणाऱ्यांची शहरात दहशत असल्यामुळे त्यांच्या विरोधात तक्रार करण्यास सर्वसामान्य नागरिक तयार होत नाही. त्यांच्यावर कार्यवाही करण्यास पोलिस कानाडोळा करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

शहरातील नागरिकांनी अवैध दारूविक्री थांबविण्यासाठी अनेक प्रसारमाध्यमांतर्गत संबधित विभागाकडे पाठपुरावा देखील केला. परंतु या उद्योगांनी पुन:श्च शहरात आपले डोके वर काढले असून पोलिस प्रशासनाच्या कार्यतत्परतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Digital India : विसरून जा पैशाचं पाकीट अन् कागदपत्रे! प्रजासत्ताक दिनला पाहा भारताचे 4 'डिजिटल ब्रह्मास्त्र', ज्यांनी देशाला बदलून टाकलंय

बापरे! मराठमोळ्या रिलस्टारचं निधन, प्रथमेश कदमच्या जाण्याने सगळ्यांनाच बसला धक्का, आई-मुलाची होती सुपरहिट जोडी

Yuvraj Singh : ''पण तू १२ चेंडू फिफ्टी मारू शकत नाहीये''; अभिषेक शर्माबाबत युवराज सिंगची पोस्ट व्हायरल!

Republic Day 2026: संपूर्ण देशाचं लक्ष वेधणारा फोटो! 77व्या प्रजासत्ताक दिनी पंतप्रधान मोदींचा खास लूक चर्चेत

Latest Marathi news Update : परेडमध्ये टी-९० भीष्म आणि अर्जुन रणगाडयांची गर्जना,नौदलाच्या संचलनात आयएनएस विक्रांतचा समावेश

SCROLL FOR NEXT