soybean producer farmer waiting for help in nagpur 
नागपूर

रब्बी हंगाम येऊनही शेतकरी प्रतीक्षेतच, सोयाबीन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत कधी?

नीलेश डोये

नागपूर : पूर आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. सरकारने शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत देण्याचे जाहीर केले. नागपूर जिल्ह्यात ६८९६८.२५ हेक्टरमध्ये सोयाबीन पिकांचे नुकसान झाले. मदतीसाठी ६४ कोटी ३९ लाख रुपयांचा प्रस्ताव पाठविण्यात आला असताना अद्याप मदत मिळाली नाही. 

जून ते ऑक्टोबर महिन्यादरम्यान झालेली अतिवृष्टी, पूर, परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. किडीमुळे सोयाबीनचे पूर्ण पीक हातचे गेले. प्रशासनाकडून सर्व्हे करण्यात आले. नागपूर जिल्ह्यात ६८ हजार ९६८ हेक्टरमध्ये सोयाबीन पिकांचे नुकसान झाले. ९१५१३ शेतकरी बाधित झाले. 
तर ९ हजार ७२१ हेक्टरमध्ये संत्रा, मोसंबी पिकांचे नुकसान झाले असून १८१४८ शेतकरी बाधित आहेत. जिल्ह्यातील १ लाख ९ हजार ६६१ शेतकरी बाधित झाले. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी ६४ कोटी ३९ लाख ६४ हजार ८० रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे दीड महिन्यापूर्वी पाठविण्यात आला. प्रशासनाकडून शासनाकडे पाठविण्यात आलेल्या प्रस्तावात हेक्टरी मदत ६ हजार ८०० रुपये शेतपिकांसाठी, तर फळपिकांसाठी १८ हजार रुपये धरण्यात आले आहे.

विशेष म्हणजे सरकारने शेतपिकांसाठी हेक्टरी १० हजार, तर फळपिकांसाठी हेक्टरी २५ हजार रुपये प्रमाणे मदत देण्याचे जाहीर केले. सरकारने दिवाळीपूर्वी १७ लाख ८३ हजार रुपये देण्यात आले. जून ते ऑक्टोबर महिन्यात आलेल्या पुरामुळे झालेल्या नुकसानासाठीच ही रक्कम देण्यात आल्याचे स्पष्ट केले होते. प्रशासनाच्या अहवालानुसार साडेनऊशेच्या जवळपास शेतकऱ्यांचे पुरामुळे नुकसान झाले. सोयाबीन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा आकडा हा त्या तुलनेत कितीतरी पटीने जास्त आहे. मदत कधी मिळेल, असाच सवाल उपस्थित करण्यात येत आहे. 

पीक नुकसान (हेक्टर) बाधित शेतकरी  मदतीसाठी आवश्यक निधी 
सोयाबीन   ६८,९६८.२५ ९१,५१३ ४६,८९,८४,१००
संत्रा, मोसंबी ९७,२१.११ १८,१४८ १७,४९,७९,९८०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Crime : मोक्कातील सांगलीच्या गुन्हेगाराचा सपासप वार करून खून, अल्पवयीन मुलांचा समावेश; वर्चस्ववाद नडला

Latest Marathi News Updates: एरंडोल येथे पोलीस स्टेशनच्यावतीने दादासाहेब पाटील महाविद्यालयात गुरु गौरव कार्यक्रमाचे आयोजन

Beed Crime : बीडमध्ये विकृतीचा कळस! निवृत्त पोलिस फौजदाराला खोलीत डांबून बेदम मारहाण; पाणी मागितले असता तोंडावर केली लघुशंका

Russia Ukraine War: रशियाच्या हल्ल्यांत युक्रेनमध्ये दोन ठार

'या' नक्षत्रांमध्ये जन्मलेली मुलं असतात अतिशय भाग्यशाली; सौंदर्य, यश आणि धनसंपत्तीने होतात समृद्ध

SCROLL FOR NEXT